Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मुलांना चांगलं वळण लावायचं तर रोज करा ८ गोष्टी, जसं आईबाबा वागतात- तेच मुलं करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:06 IST

1 / 9
मुलांना योग्य वळणं लावणं ही एक संयमाची आणि प्रेमाची प्रक्रिया आहे त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. (How To Inculcate Good Values In Kids)
2 / 9
मुलं उपदेशापेक्षा मोठ्यांच्या वागण्याचं अनुकरण जास्त करतात. त्यामुळे आपले वागणे आदर्श ठेवा. (8 Effective Ways To Discipline Your Child)
3 / 9
शिस्त लावताना ती भितीपेक्षा प्रेमावर आधारीत असावी. मुलांशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण करा.
4 / 9
अभ्यासाची, खेळण्याची आणि झोपवण्याची वेळ निश्चित केल्यास मुलांना शिस्तीची सवय लागते.
5 / 9
सतत मुलांवर ओरडण्याऐवजी त्यांच्या चुकांचे परिणाम शांतपणे समजावून सांगा आणि त्यांना योग्य ती शिक्षा द्या. ज्यातून मुलं शिकतील.
6 / 9
जेव्हा मुलं चांगली गोष्ट करतात तेव्हा त्यांचे मनापासून कौतुक करा. ज्यामुळे त्यांना चांगलं वागण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
7 / 9
काय बरोबर काय चूक यातील फरक त्यांना स्पष्ट शब्दांत समजावून सांगा आणि काही गोष्टींना स्पष्ट नाही म्हणायला शिका.
8 / 9
वळणं लागणं ही एका दिवसाची प्रक्रिया नाही. त्यासाठी पालकांनी सतत प्रयत्नशील राहणं आणि धीर धरणं आवश्यक आहे.
9 / 9
मुलांना वेळ देताना स्वत:मोबाईलपासून दूर राहा. जेणेकरून त्यांना तुमचे पूर्ण अटेंशन मिळेल.
टॅग्स : पालकत्वलहान मुलं