By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 16:55 IST
1 / 8उन्हाळ्याची सुटी म्हणजे मुलांसाठी नुसता खेळ आणि मजा नसते तर नवीन कौशल्य आत्मसात करण्याची ही उत्तम संधी असते. या सुटीत तुम्ही मुलांना 7 महत्वाच्या गोष्टी शिकवू शकता.2 / 8 मोबाईल आणि टिव्हीपासून दूर राहून क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन किंवा पोहणं यांसारखे खेळ शिकवा, यामुळे मुलांचे शारीरिक आरोग्य सुधारते आणि त्यांन शिस्त लागते.3 / 8मुलांना स्वत:ची कामं स्वत: करायला शिकवा. जसं की जेवण झालं की ताट उचलणं, कपड्यांच्या घड्या घालणं, खोली आवरणं. यामुळे त्यांच्यात जबाबदारीची जाणीव येते.4 / 8मुलांना गोष्टीची पुस्तकं, माहितीपर मासिक किंवा थोर पुरूषांची चरित्र वाचायला द्या. या वाचनामुळे मुलांचा शब्द संग्रह वाढतो. कल्पनाशक्ती विस्तारते.5 / 8 मुलांना पैशांचे महत्व समजावून सांगा. त्यांना पिगी बँक आणून द्या आणि खाऊच्या पैशातून थोडे पैसे वाचवायला सांगा.6 / 8घरातली कड्यांमध्ये छोटी रोपं लावणं, त्यांना दररोज पाणी देणं आणि पक्षांसाठी गच्चीवर दाणे-पाणी ठेवणं यांसारख्या गोष्टी शिकवा. यामुळे मुलांना निसर्गाची ओढ लागेल7 / 8 आजच्या काळात संगणकीय ज्ञान आवश्यक आहे मुलं साधं कोडिंग शिकू शकतात किंवा एखादी नवीन भाषा शिकण्यास सुरूवात करू शकतात. यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते.8 / 8 मुलांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी त्यांना चित्रकला, ओरिगामी, मातीकाम किंवा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवायला शिकवा. ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल.