उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना नक्की शिकवा ७ गोष्टी; आत्मविश्वास वाढून आनंदी होतील मुले

Updated:April 5, 2026 16:55 IST2026-04-05T16:46:05+5:302026-04-05T16:55:35+5:30

7 Skills Kids Should Learn This Summer Vacation : घरातली कड्यांमध्ये छोटी रोपं लावणं, त्यांना दररोज पाणी देणं आणि पक्षांसाठी गच्चीवर दाणे-पाणी ठेवणं यांसारख्या गोष्टी शिकवा.

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना नक्की शिकवा ७ गोष्टी; आत्मविश्वास वाढून आनंदी होतील मुले

उन्हाळ्याची सुटी म्हणजे मुलांसाठी नुसता खेळ आणि मजा नसते तर नवीन कौशल्य आत्मसात करण्याची ही उत्तम संधी असते. या सुटीत तुम्ही मुलांना 7 महत्वाच्या गोष्टी शिकवू शकता.

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना नक्की शिकवा ७ गोष्टी; आत्मविश्वास वाढून आनंदी होतील मुले

मोबाईल आणि टिव्हीपासून दूर राहून क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन किंवा पोहणं यांसारखे खेळ शिकवा, यामुळे मुलांचे शारीरिक आरोग्य सुधारते आणि त्यांन शिस्त लागते.

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना नक्की शिकवा ७ गोष्टी; आत्मविश्वास वाढून आनंदी होतील मुले

मुलांना स्वत:ची कामं स्वत: करायला शिकवा. जसं की जेवण झालं की ताट उचलणं, कपड्यांच्या घड्या घालणं, खोली आवरणं. यामुळे त्यांच्यात जबाबदारीची जाणीव येते.

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना नक्की शिकवा ७ गोष्टी; आत्मविश्वास वाढून आनंदी होतील मुले

मुलांना गोष्टीची पुस्तकं, माहितीपर मासिक किंवा थोर पुरूषांची चरित्र वाचायला द्या. या वाचनामुळे मुलांचा शब्द संग्रह वाढतो. कल्पनाशक्ती विस्तारते.

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना नक्की शिकवा ७ गोष्टी; आत्मविश्वास वाढून आनंदी होतील मुले

मुलांना पैशांचे महत्व समजावून सांगा. त्यांना पिगी बँक आणून द्या आणि खाऊच्या पैशातून थोडे पैसे वाचवायला सांगा.

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना नक्की शिकवा ७ गोष्टी; आत्मविश्वास वाढून आनंदी होतील मुले

घरातली कड्यांमध्ये छोटी रोपं लावणं, त्यांना दररोज पाणी देणं आणि पक्षांसाठी गच्चीवर दाणे-पाणी ठेवणं यांसारख्या गोष्टी शिकवा. यामुळे मुलांना निसर्गाची ओढ लागेल

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना नक्की शिकवा ७ गोष्टी; आत्मविश्वास वाढून आनंदी होतील मुले

आजच्या काळात संगणकीय ज्ञान आवश्यक आहे मुलं साधं कोडिंग शिकू शकतात किंवा एखादी नवीन भाषा शिकण्यास सुरूवात करू शकतात. यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते.

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना नक्की शिकवा ७ गोष्टी; आत्मविश्वास वाढून आनंदी होतील मुले

मुलांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी त्यांना चित्रकला, ओरिगामी, मातीकाम किंवा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवायला शिकवा. ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल.