Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दिवसभराच्या कामानं प्रचंड थकवा येऊनही रात्री झोप लागत नाही, डोक्यात विचारांचा भुंगा; पाहा असं का होतं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:33 IST

1 / 8
Overthinking at Night : सकाळपासून दिवसभर एकापाठी एक काम केल्यावर मानसिक आणि शारीरिक थकवा येतोच येतो. आपण पाहिलं असेल की, रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर थकलेलं असतं, झोपण्याची खूप इच्छा झालेली असते, पण मेंदू काही आपल्याला झोपू देत नाही. म्हणजे मेंदू अॅक्टिव राहतो. भूतकाळातील काही गोष्टी, भविष्याचं टेंशन आणि बिनाकामाचे विचार डोक्यात सतत गोंधळ घालत असतात. ज्यामुळे काही केल्या झोप येत नाही. आपल्यासोबतही असं अनेकदा झालं असेल. या समस्येला ओव्हथिंकींग म्हणतात. रात्री झोपायचं असताना होणारी ओव्हरथिंकींग आणि झोप न लागण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. ही काही अचानक होणारी समस्या नाही. अशात पाहुयात की, रात्री शरीर थकलेलं असताना सुद्धा मेंदू कसा अॅक्टिव राहतो. (Image Credit : getsurrey.co.uk)
2 / 8
एक्सपर्ट सांगतात की, मुळात रात्री मेंदूचा एक भाग जास्त सक्रिय असतो. ज्याला डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हटलं जातं. मेंदूचा हा भाग आत्मविश्लेषण, भूतकाळ किंवा भविष्याबाबत विचार यासाठी कारणीभूत असतो. जे लोक तणाव किंवा चिंतेत आहेत, त्यांच्यात ही प्रक्रिया जास्त बघायला मिळते. पुन्हा पुन्हा नकारात्मक विचार डोक्यात येऊ लागतात. त्यामुळे झोपतेवेळी मेंदू शांत राहत नाही.
3 / 8
तसं पहायला गेलं तर रात्री शरीर हळूहळू आरामाच्या मोडमध्ये जात असतं. पण झोप न येण्याची समस्या असणाऱ्या लोकांमध्ये तणावाशी संबंधित भाग अॅक्टिव राहतो. यादरम्यान शरीरात कोर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन्सचं प्रमाण अधिक वाढतं. ज्यामुळे शरीराला वाटतं की, आताही ते एखाद्या गोष्टीच्या दबावात किंवा धोक्याच्या स्थितीत आहेत. मग काय झोपेचं खोबरं होणं आलंच.
4 / 8
दुसरीकडे चांगली झोप येण्यासाठी मेंदूमध्ये काही केमिकल्सचं संतुलन फार महत्वाचं असतं. यातील काही मेंदूला शांत करतात. तर काही त्याला सक्रिय ठेवतात. जेव्हा या केमिकल्सचं संतुलन बिघडतं तेव्हा मेंदूला आराम करण्यात अडथळा निर्माण होतो. अशात अस्वस्थता, अनेक विचार व झोप न येणे अशा समस्या होतात. (Image Credit : WebMd)
5 / 8
झोप जर पूर्ण झाली नाही तर याचा प्रभाव मेंदूच्या त्या भागावर होतो, जो निर्णय घेणे आणि इमोशन कंट्रोल करतो. याकारणाने छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या वाटू लागतात आणि त्रासदायक वाटू लागतात. रात्री हे जास्त जाणवतं. ज्यामुळे चिंता आणि ओव्हरथिंकींग वाढते. (Image Credit : macombmedicalclinicpc.com)
6 / 8
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे एक्सपर्ट असंही सांगतात की, पचन तंत्र आणि मेंदूमध्ये खोलवर संबंध असतो. जर पोटात काही गडबड असेल तर याचा थेट प्रभाव मेंदूवर पडतो.
7 / 8
एक्सपर्ट सांगतात की, काही रोजच्या सवयी सुद्धा रात्री मेंदूला शांत होऊ देत नाहीत. जसे की, झोपण्याची फिक्स वेळ नसणे, रात्री उशिरापर्यंत मोबाइल किंवा स्क्रीन बघणे, दारू पिणे किंवा काही औषधांमुळेही झोपेचं चक्र बिघडतं.
8 / 8
जर ओव्हरथिंकींग टाळायचं असेल चांगली झोप हवी असेल तर काही छोटे छोटे बदल करू शकता. जसे की, रात्री झोपण्याची वेळ फिक्स ठेवा, झोपण्याआधी स्क्रीन बघू नका, रोज हलका व्यायाम करा आणि मेडिटेशन करा. त्याशिवाय संतुलित आहार घ्या आणि हेल्दी लाइफस्टाईल ठेवा.
टॅग्स : मानसिक आरोग्यहेल्थ टिप्स