By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:53 IST
1 / 10मानसिकरित्या मजबूत असलेल्या व्यक्तींना हे नीट माहीत असतं की त्यांना काय वाटतंय आणि का वाटतंय ते रागाच्या भरात वाहून न जातात त्या भावनेमागचं कारण शोधतात. (Know that you are Mentally Strong through these 10 signs)2 / 10अशा व्यक्ती बदलाला घाबरत नाहीत. परिस्थितीत बदलली की ते रडत न बसता नव्या परिस्थितीशी कसं जुळवून घेता येईल यावर लक्ष केंद्रीत करतात. त्यांच्यासाठी बदल ही प्रगतीची संधी असते. (10 Signs That Shows You Are Mentally Strong)3 / 10प्रत्येकाला खूश ठेवण्याच्या नादात स्वत:चा बळी न देणे हे मानसिक ताकदीचं लक्षण आहे. जिथे गरज आहे तिथे स्पष्टपणे आणि नम्रपणे नाही म्हणणं त्यांना जमतं.4 / 10 ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यावर स्ट्राँग लोक आपली उर्जा वाया घालवत नाहीत. ते फक्त त्यांच्या कृती आणि प्रतिक्रियेवर लक्ष देतात.5 / 10 अपयश आल्यावर ते खचून जात नाहीत. मी हरलो म्हणण्यापेक्षा मी काय शिकलो असा विचार ते करतात आणि पुन्हा नव्या जोमानं प्रयत्न करतात.6 / 10मानसिकदृष्ट्या सक्षम लोक दुसऱ्याच्या प्रगतीचा आनंद साजरा करतात. कोणाशीही तुलना करण्यापेक्षा कालच्या स्वत:पेक्षा आजचा मी किती चांगला आहे यावर त्यांचा भर असतो.7 / 10 त्यांना स्वत:च्या सोबतीचा कंटाळा येत नाही. शांत बसून विचार करणं किंव स्वत:साठी वेळ काढणं यात त्यांना भिती वाटत नाही. त्यांना आनंद राहण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत नाही.8 / 10 जे झालं ते बदलता येणार नाही हे ते स्वीकारतात. भूतकाळातील चुकांबद्दल पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा वर्तमानात जगण्यावर आणि भविष्ट सुधारण्यावर त्यांचा विश्वास जास्त असतो.9 / 10ते कधीही आपल्या परिस्थितीसाठी नशिबाला किंवा दुसऱ्या व्यक्तीला दोष देत नाहीत. आपल्या सुखाची आणि प्रगतीची जबाबदारी ते स्वत: घेतात.10 / 10कोणत्याही गोष्टी फळ लगेच मिळावं अशी त्यांची अपेक्षा नसते. मोठे बदल घडायला वेळ लागतो हे ओळखून ते शांतपणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहतात.