मोबाइल तुमच्या जीवावर उठलाय! तुम्ही ‘या’ ५ चुका करत असाल तर जीवाला धोका आहे..
Updated:June 24, 2025 13:56 IST2025-06-24T13:50:28+5:302025-06-24T13:56:00+5:30
If you are also making these 5 mistakes while using mobile phone please be safe, social media addiction : सतत मोबाइल वापरत असाल तर पाहा काय त्रास होऊ शकतो. वेळीच अतिवापर थांबवा.

मोबाइल ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाइल कायम असतोच. रोजची बरीच कामे, अगदी किराणा यादीही आजकाल मोबाइलमध्येच नोट केली जाते. मोबाइल वापरण्याची गरज तर आहेच मात्र त्याचे व्यसनही लोकांना लागले आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यासाठी वाईटच ठरतो. ती गोष्टी कितीही उपयोगाची असली तरी जास्त वापरणे वाईटच ठरते. उठल्यापासून झोपेपर्यंत नुसता मोबाइल वापरणारे लोकही आहेत. मोबाइल वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते.
मोबाइलमुळे डोळे खराब होतात हे तर आपण जाणून आहोत. मात्र हा तोटा माहिती असतानाही सर्रास मोबाइल वापरत असाल तर नंतर पस्तावायची वेळ येऊ शकते. कामाव्यतिरिक्त दिवसातून किती वेळ मोबाइल वापरायचा याचे बंधन घालून घ्या. डोळ्यांचे आरोग्य फार जपावे लागते.
रस्त्यातून चालताना तुम्हीही मोबाइल वापरता का? चालताना पूर्ण लक्ष रस्त्यावरच असायला हवे. गाडी चालवताना, चालताना कधीही मोबाइल वापरायचा नाही. मोबाइल पाहत चालताना अपघात होण्याची शक्यता वाढते. संकटाला समोरुन आमंत्रण दिल्यासारखा प्रकार ठरेल.
मोबाइलवर आजकाल अज्ञात नंबर , ॲप यांचे मेसेज येतात. तसेच कॉल येतात. तुम्ही जिंकला आहात किंवा लॉटरी लागली आहे असा दावा करणाऱ्या लिंकच कधीही उघडायच्या नाहीत. सायबर क्राईमचे वाढते प्रमाण धोक्याचे आहे. त्यामुळे मोबाइल वापरताना जपून वापरावा.
मोबाइलच नोटिफीकेशन ॲडिक्शन ही एक वाढती समस्या आहे. सतत मोबाइल पाहत राहायची सवय लागते. कोणी मेसेज केला किंवा कोणी काय पोस्ट केले याचे नोटीफीकेशन दिसताच मान ताडकन वळते. हा प्रकार ॲडिक्शनचाच आहे. सतत मोबाइल पाहणे टाळायला हवे.
वरच्या खिशात किंवा झोपताना डोक्याशी मोबाइल ठेवायचा नाही. त्यातून निघणारी वायब्रेशन्स आरोग्यासाठी चांगली नाहीत. शरीरापासून मोबाइल दूर ठेवायचा.