लबाड कोण-सज्जन कोण? ७ गोष्टी पाहा-चटकन कळेल कोण मनापासून चांगलं वागतंय-कोण करतंय नाटक
Updated:April 10, 2026 17:09 IST2026-04-10T12:58:36+5:302026-04-10T17:09:28+5:30
How to decide If Person Is Good Or Bad : नजर चोरून बोलणं किंवा बोलण्यात वारंवार बदल करणं ही लबाडीची लक्षणं असू शकतात.

माणसं ओळखणं ही एक कला आहे. जी अनुभवाने आणि निरिक्षणानं विकसित होते. एखादी व्यक्ती मनातून कशी आहे हे समजून घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. (How to decide If Person Is Good Or Bad)
माणूस काय बोलतो त्यापेक्षा कसा वागतो
माणूस काय बोलतो त्यापेक्षा तो इतरांशी कसा वागतो स्वत:पेक्षा खालच्या स्तरावरील लोकांशी कसा वागतो यावरून त्याचा स्वभाव कळतो. (What Does It Mean To Be a Good Person)
कठीण काळात संयम
कठीण काळात किंवा वादाच्यावेळी माणूस आपला संयम किती राखतो यावरून त्याच्या मानसिकतेची ओळख पटते.
अपेक्षा न ठेवता कसा वागतो.
जेव्हा एखाद्याकडून काहीच मिळण्याची अपेक्षा नसते तेव्हा तो तुम्हाला कशी वागणूक देतो यावरून त्याचा खरेपणा सिद्ध होतो.
शब्दाला जागणं
शब्दाला जागणे आणि विचारांमध्ये स्पष्टता असणारी माणसं विश्वासार्ह असतात.
नजर चोरून बोलणं
नजर चोरून बोलणं किंवा बोलण्यात वारंवार बदल करणं ही लबाडीची लक्षणं असू शकतात.
निंदा करणं
जी व्यक्ती तुमच्यासमोर इतरांच्या उणिवा काढते ती तुमच्या पाठीमागे तुमचीही निंदा करण्याची शक्यता जास्त असते.
माणसाची वागणूक
माणसाचे शब्द क्षणिक असू शकतात पण त्याचे कृतित्व आणि वागणूक त्याच्या खऱ्या व्यक्तित्वाची साक्ष देतात.