1 / 10आजूबाजूची परिस्थिती जरा कठीण असली किंवा काही क्रूर गोष्टी घडत असल्या तर जरा मन विचलित होते. मनाने कितीही मजबूत व्यक्ती असली तरी डोक्यात कुठे तरी विचार चालू असतातच. 2 / 10असे विचार डोक्यात साठून राहतात. मानसिकता बदलते आणि मग उदास वाटायला लागते. अशावेळी शारीरिक ताण जरी आला नाही तरी मानसिक ताण भरपूर असतो. मुख्य म्हणजे असा ताण दिसून येत नाही मात्र त्याचा परिणाम वाईट होतो. 3 / 10ताण तणाव कमी करण्यासाठी लक्ष इतर गोष्टींमध्ये गुंतवणे गरजेचे असते. त्यासाठी काही कृती करता येतात. अशा काही गोष्टी असतात ज्या केल्याने ताण-ओव्हर थिंकींग जरा कमी होते. 4 / 10डोक्यात विचारांचा कल्लोळ उडाला असेल तर काहीच सुचत नाही. विचार थांबवणे फार कठीण गोष्ट आहे. अशावेळी जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारण्याचा फार फायदा होतो. मन मोकळेपणाने त्या व्यक्तीशी बोला. डोक्यात कोंडलेले विचार बाहेर काढा.5 / 10म्युझिक थेरपी विषयी तर तुम्ही ऐकलंच असेल. चांगली गाणी ऐकणे मनाला शांत करते. तुमचे आवडते गाणे ऐका. संगीत ऐका. जर स्वत: कोणते वाद्य वाजवत असाल तर त्याचा रियाज करा. ताण नक्कीच कमी होतो. सकारात्मकता वाढते. 6 / 10चहा आवडतो का कॉफी? दोन्ही नाही तर मग जायफळ घातलेले दूध हा सुद्धा पर्याय मस्त आहे. इतर लेमन टी सारखे गरम पदार्थही आहेत जे प्यायल्याने मनाला शांती मिळते. आराम मिळतो. शांत जागी बसून एखाद कप आवडते गरम पेय प्या. 7 / 10ध्यान केल्याने आराम मिळतो हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे सोपी योगासने तसेच मेडीटेशन करा. इतरही काही व्यायाम असतात जे केल्याने आराम मिळतो. आवडा खेळ खेळा. खेळताना डोक्यात इतर कोणतेही विचार येत नाहीत. 8 / 10एखादे चांगले पुस्तक वाचा. चांगला विनोदी चित्रपट पाहा. सतत खून-मारामार्या असलेले चित्रपट पाहत असाल तर ते पाहू नका. त्याचाही विचारांवर परिणाम होतो. काही तरी चांगले सकारात्मक पाहा. 9 / 10कोमट पाण्याने स्वच्छ अंघोळ करा आणि छान झोप काढा. झोप झाली नसेल तरी चिडचिड होते. त्यामुळे निराशा वाढते. चांगली झोप झाल्यावर मन प्रसन्न राहील. कामातही मन लागेल. 10 / 10निसर्गात गेल्याने फार छान वाटते. पाणवठ्याच्या ठिकाणी फेरफटका मारा. तसे काही नसेल तर साध्या बागेतून फेऱ्या मारा किंवा मग लाँग वॉकला जा. चांगल्या वातावरणामुळे फरक पडतो.