Join us

याद करो कुर्बानी! कुणी गरोदर असताना लढलं, कुणी सिध्द केलं देशप्रेम, दिले सर्वोच्च बलिदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 14:07 IST

1 / 7
भारताच्या विविध सशस्त्र दलांचे नेतृत्व करायची संधी महिलांना जेव्हाही मिळाली तेव्हा त्यांनी कमालीची कामगिरी बजावली आहे. फक्त नेतृत्व करतानाच नाही तर इतरही अनेक जबाबदाऱ्या पेलताना भारतीय महिलांनी बलिदान दिले आहे. अत्यंत जोखमीने आपले काम चोख केले आहे. कर्तव्यकठोर महिलांचे ऋण आपण मान्यच करायला हवे.
2 / 7
कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये अत्यंत महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. भारतीय महिला कर्तृत्ववान आहेत आणि आणीबाणीतही त्या अत्यंत ठाम उभं राहून आपलं काम चोख करतात.
3 / 7
आजवर अशीच चोख कामगिरी करणाऱ्या महिलांना मानाचा सलाम आपण करायलाच हवा. त्यातलंच पहिलं नाव म्हणजे भारताच्या आझाद हिंद फौजेची पहिली महिला गुप्तहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरा आर्य. त्यांची कहाणी ऐकताना अंगावर काटा येतो. नीरा आर्य यांच्याकडून गुप्त माहिती काढून घेण्यासाठी शत्रूने त्यांच्यावर प्रचंड अत्याचार केले. त्यांचे स्तन कापले. मात्र त्यांचे देशप्रेम असे की त्यांनी शत्रूला काहीही सांगितले नाही.
4 / 7
कॅप्टन यशिका त्यागी भारतीय लष्कराच्या लॉजिस्टिक्स विभातील एक मोठे नाव आहे. कारगिल सारख्या महत्त्वाच्या युद्धात त्यांनी लॉजिस्टिक विभातील महिलांचे नेतृत्व केले. त्या दरम्यान त्यागी गर्भवती होत्या. पोटात बाळ असतानाही देशाप्रति कर्तव्य निभावत युद्धात काम केलं. आईपण आणि देशप्रेम दोन्ही निभावले.
5 / 7
भारतीय नौदलामध्ये अधिकारी म्हणून कार्य केलेल्या लेफ्टनंट किरण शेखावत. २४ मार्च २०१५ ला गोव्याच्या किनारी झालेल्या डोर्नियर विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनीही नौदलात उत्तुंग काम केलं.
6 / 7
शांती तिग्गा हे नाव ऐकल्यावर मनाला चटका लागतो. भारतीय सेनेच्या रेल्वे रेजिमेंटमध्ये भरती झालेल्या शांती तिग्गांचा २०१३ साली रेल्वे रुग्णालयात मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूबद्दल आजही अनेक प्रश्न चिन्ह आहेत.
7 / 7
गुंजन सक्सेना या कारगिल गर्लने तर अनेकांची तोंड गप्प करत इतिहास रचला. कारगिल युद्धात लढणाऱ्या महिला वैमानिक गुंजनने शत्रूच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली होती. सैनिकांची काळजी घेत इतरही भूमिका बजावल्या.
टॅग्स : महिलाभारतयुद्धसैनिक