1 / 13हाय ब्लड प्रेशरची समस्या म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह सामान्यापेक्षा जास्त वेगाने होणे. आपल्यापैकी अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो आणि जर त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ही समस्या गंभीर होऊ शकते(World Health Organisation Tells How To Get Rid Of High Blood Pressure).2 / 13वाढते वय, जास्त वजन वाढणे, जास्त सोडियमयुक्त आहार, जास्त मद्यपान, अनुवंशिकता आणि शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह नसणे यामुळे उच्च रक्तदाब (हाय बीपी) होऊ शकतो. 3 / 13जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरात ३० ते ७९ वयोगटातील १.२८ अब्ज लोक हाय बी.पीच्या समस्येने हैराण आहेत. त्याचवेळी, ४६ % लोकांना हे माहितच नाही की त्यांना हाय बी. पी (उच्च रक्तदाब) चा त्रास आहे. 4 / 13उच्च रक्तदाबामुळे हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार आणि स्ट्रोक होतो. अशा परिस्थितीत, या समस्येवर वेळीच उपचार करणे महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत जी लक्षात ठेवल्यास, उच्च रक्तदाबाच्या समस्येवर प्राथमिक उपचार करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.5 / 13उच्च रक्तदाबामुळे छातीत दुखणे, डोकेदुखी, अशक्तपणा, चिंता, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, कानात आवाज येणे, नाकातून रक्त येणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि अंधुक दृष्टी यासारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवून उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. 6 / 13WHO च्या मते, निरोगी आहार घेणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या नेहमीच्या जेवणात कमीत कमी मीठ असेल याची खात्री करा. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब होतो.7 / 13वाढत्या वजनावर देखील लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी वजन कमी करणे महत्वाचे आहे. वजन कमी केल्याने रक्तदाब कमी होण्यावर परिणाम होतो. 8 / 13कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल न केल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो. अशा परिस्थितीत शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह राहणे महत्वाचे आहे. काही एक्सरसाइज आणि योगासने तुमच्या डेली रुटीनचा आवश्यक भाग बनवा. 9 / 13धूम्रपान किंवा मद्यपान यांसारख्या वाईट सवयी वेळीच सोडून द्याव्यात. 10 / 13आपल्या रोजच्या निरोगी आहारसोबतच, डाएटमध्ये जास्त फळ आणि भाजीपाल्यांचा समावेश करावा. 11 / 13कामाचा किंवा इतर गोष्टींचा ताण घेणे कमी करा. अधिक प्रमाणात ताण घेतल्याने देखील हाय ब्लड प्रेशरची समस्या सतावते. 12 / 13जर आपल्याला खूप आधीपासूनच ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर, नियमित ब्लड प्रेशर तपासत राहा.13 / 13नेहमी फ्रेश वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा, प्रदूषित हवेपासून दूर रहा.