Join us   

उन्हाळ्यात जेवणाबरोबर कांदा खावा की नाही? ९० टक्के लोक असतात कन्फ्यूज; कांदा खाण्याचे ५ फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 2:46 PM

1 / 7
ऊन्हाळ्याच्या दिवसांत लोकांना त्वचेच्या समस्यांबरोबरच इतर समस्याही उद्भवतात. स्वत:ला डिहायड्रेशनपासून वाचवणं फार महत्वाचे असते. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला अधिकाधिक फायदे मिळतात. ज्यामुळे तुम्ही दिवसभर कोणत्याही समस्याही उद्भवत नाहीत. आयुर्वेदाचार्य जितेंद्र शर्मा यांनी कच्चा कांदा खाण्याचे फायदे सांगितले आहेत.
2 / 7
आयुर्वेदाचार्य डॉ. जितेंद्र शर्मा सांगतात की ऊन्हाळ्याच्या दिवसांत गरमीमुळे लोक आजारी पडतात. अशा स्थितीत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि स्ट्रोकसारख्या समस्याही उद्भवत नाहीत.
3 / 7
एक्सपर्ट्सच्यामते जेव्हा खूप ऊन असते तेव्हा कच्च्या कांद्याचे सेवन करायला हवे. यात अनेक गुण असतात. ज्यामुळे शरीराला गारवा मिळण्यास मदत होते.
4 / 7
एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी कार्सिनोजेसिनने परिपूर्ण कांदा एखाद्या औषधाप्रमाणे काम करतो. कांद्यात सेलेनियम नावाचे तत्व असते ज्यामले इम्यूनिटी वाढण्यास मदत होते.
5 / 7
ऊन्हाळ्याच्या दिवसांत डायबिटीसच्या रुग्णांनी पांढऱ्या कांद्याचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. ज्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
6 / 7
कांद्यात सल्फर, क्वेर्सिटीनसारखे एंटी डायबिटीस कंम्पाऊंड्स असतात ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
7 / 7
एक्सपर्ट्सच्यामते ऊन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांचे पोट खराब होते. तुम्ही कच्चा कांदा लिंबाच्या रसाबरोबर किंवा सॅलेडबरोबर खाल्ल्याने डायजेशन चांगले राहण्यास मदत होते आणि पोटाशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स