केळीच्या पानात जेवण का फायद्याचं असतं, ५ कारणं-म्हणून पारंपरिक पंगतीत केळीच्या पानावर वाढतात पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:54 IST
1 / 8भारतीय संस्कृतीमध्य केळीच्या पनावर जेवणं ही एक प्राचीन आणि आरोग्यदायी परंपरा आहे. केळीच्या पानांवर जेवल्यानं काय फायदे होतात ते समजून घ्या. (Eating on banana leaves Benefits)2 / 8केळीची पानं नैसर्गिकरित्या स्वच्छ असतात. त्यावर अन्नावर परिणाम करणारे कोणतेही रासायनिक घटक किंवा जंतू नसतात. त्यामुळे ते प्लास्टीक किंवा इतर भांड्यांपेक्षा जास्त सुरक्षित मानले जातात.3 / 8केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनोल्स नावाचे नैसर्गिक एंटी ऑक्सिडंट्स असतात. जेव्हा गरम अन्न पानांवर वाढले जाते तेव्हा हे घटक अन्नात मिसळतात. जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात.4 / 8केळीच्या पानावर जेवल्यानं अन्नाची चव वाढतेच पण त्यातील नैसर्गिक गुणांमुळे अन्नाचे पचन सुलभ होते.5 / 8केळीची पानं नैसर्गिक आणि बायोडिग्रेडेबल असतात. जेवण झाल्यावर ती फेकून दिली तरी त्याचे सहज विघटन होते.ज्यामुळे प्रदूषणाचा धोका नसतो.6 / 8प्लास्टीक किंवा थर्माकॉलच्या पत्रावळींमध्ये गरम अन्न खाल्ल्यास रसायनं पोटात जाण्याची भिती असते. परंतू केळीच्या पानांबाबत असा कोणताही धोका नसतो.7 / 8केळीच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात जे अन्नातील सुक्ष्म जंतूंना नष्ट करण्यास मदत करतात. यामुळे अन्नातून होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होतो.8 / 8भारतीय परंपारेत केळीचे झाड हे समृद्धीचे प्रतिक मानले जाते. पानावर जेवल्यानं मनाला शांती आणि एक प्रकारची सकारात्मकता मिळते जी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते.