Join us
Daily Top 2 Weekly Top 5

बहुसंख्य महिलांचं हिमाेग्लोबिन कमी का असतं? लोहयुक्त पदार्थ खाऊनही HB वाढत नाही कारण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2026 15:29 IST

1 / 5
बहुतांश महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता असते. कधीही तपासायला गेलं तरी त्यांचं हिमाेग्लोबिन कमीच असतं.
2 / 5
काही महिला तर हिमोग्लोबिन किंवा शरीरातली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी नियमितपणे लोहयुक्त पदार्थ खातात. पण तरीही लोह काही वाढत नाही.
3 / 5
असं होण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात अन्नपदार्थांमधून मिळालेलं लोह शरीरात व्यवस्थित शोषून घेतलं जाण्यासाठी शरीरात ॲसिड लेव्हल चांगली असायला हवी.
4 / 5
यासाठी व्हिटॅमिन सी खूप गरजेचं आहे. त्यामुळे शरीरातलं लोह वाढवायचं असेल तर लोहयुक्त पदार्थ तर खायलाच हवेत, पण त्यासोबतच व्हिटॅमिन सी असणारे पदार्थही खायला हवे.
5 / 5
रोजच्या जेवणात लिंबू पिळून घेण्याची सवयही खूप चांगली आहे. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं अशा लोकांनी रोज जेवणात भाजीवर, कोशिंबीरीवर किंवा आमटीमध्ये लिंबू पिळून खावं. लोह वाढण्यास नक्कीच मदत होईल.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिलाफळे