1 / 8डाएट करणारे लोक रात्री कमी खातात किंवा रात्रीचं जेवण खूप लवकर घेतात. याची सवय नसली की मग सुरुवातीला मध्यरात्रीच खूप भूक लागते. काहीतरी खावंसं वाटतं.(what to eat during midnight cravings?)2 / 8ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांनाही रात्री शुगर कमी होऊन अंगातली एनर्जी कमी झाल्यासारखी वाटते आणि काहीतरी खावंसं वाटतं.(how to get rid of midnight cravings?)3 / 8अशावेळी काही काही लोक काय मिळेल ते पदार्थ खातात. यामुळे मग दिवसभराची मेहनत पाण्यात जाते आणि वजन, शुगर या दोन्ही गोष्टी वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच असं मध्यरात्री क्रेव्हिंग झालं तर काय खावं, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही माहिती...(best food to fulfill midnight cravings and sugar cravings)4 / 8डाॅक्टर सांगतात की मध्यरात्री भूकेची जाणीव झाल्यास हा त्रास भुकेमुळेच होतो आहे का की तुम्हाला तहान लागली आहे म्हणून होतोय, हे आधी तपासा. उठल्यानंतर आधी ग्लासभर पाणी प्या. त्यानंतर थोडी वाट पाहा. कदाचित काही खाण्याची इच्छा होणारही नाही. 5 / 8भूक लागल्यासारखी वाटली तर सुकामेवा कायम तुमच्या घरात असू द्या. बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर, पिस्ता असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.6 / 8घरात सुकामेवा नसेल तर मुठभर शेंगदाणे, फुटाणे खाऊनही तुम्ही तुमची भूक भागवू शकता. 7 / 8सफरचंद आणि पेरू हे दोन उत्तम फळं आहेत. ती खाल्ली तरी चालेल. जर गोड फळ खाण्याची इच्छा होत असेल तर डाळिंब खाण्यावर भर द्या. 8 / 8गाजर खाल्लं तरी चालेल. गाजरामुळे तुमची भूक आणि गोड खाण्याची इच्छा या दोन्ही गोष्टी कमी होऊ शकतात.