Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात बीपी अचानक लो झाले तर चटकन करा ७ गोष्टी, चक्कर येणं-अंधेरी येणंही टळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:49 IST

1 / 8
अचानक रक्तदाब कमी झाल्यावर (Low BP) घाबरून न जाता तातडीनं काही पाऊलं उचलणं महत्वाचं आहे. (What To Do When BP Is Low Immediately)
2 / 8
BP लो झाल्यावर व्यक्तीनं त्वरीत जमिनीवर किंवा बेडवर झोपावे. झोपल्यानंतर पायंच्या खाली 2 ते 3 उशा ठेवून पाय हृदयाच्या पाळीपेक्षा उंच करावेत. (What To Do If BP Goes Low)
3 / 8
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून प्या. कारण मीठ रक्तदाब वाढवण्यास मदत करते.
4 / 8
जर डिहायड्रेशनमुळे बीपी लो झाला असेल तर साधं पाणी किंवा इलेक्ट्रॉल पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
5 / 8
अचानक उभं राहू नका किंवा वेगानं हालचालही करू नका. यामुळे चक्कर येऊन पडण्याची भिती असते.
6 / 8
चहा किंवा कॉफी घेतल्यानं रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो. अनेकदा डिहायड्रेशनमुळे बी.पी लो होतं. यामुळे पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
7 / 8
जरअशक्तपणामुळे बी. पी लो झाला असेल तर डार्क चॉकलेटचा एखादा तुकडा खा किंवा मीठ लावलेले पदार्थ खाल्ल्यानंही फायदा होतो.
8 / 8
तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. ५ ते ६ तुळशीची पानं चावून खाल्ल्यानं किंवा त्याचा रस मधासोबत घेतल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल