खिचडीला इंग्लिशनमध्ये काय म्हणतात? IAS-IPS यांना माहीत नसेल उत्तर, तुम्हाला जमतंय का पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 15:32 IST
1 / 7भारतात सर्वांच्याच घरी भात किंवा भाताशी संबंधित इतर पदार्थ खाल्ले जातात. खिचडी हा त्यापैकीच एक असलेला पदार्थ आहे. डाळ- तांदळाची पौष्टीक खिचडी खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. 2 / 7लोणचं, पापड, तूपाबरोबर खाल्ली जाणारी खिचडी एक हलका आणि पौष्टीक आहार आहे.3 / 7भारताव्यतिरिक्त मध्य पूर्व देशांमध्ये आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये खिचडी प्रसिद्ध आहे. खिचडी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते आणि खिचडीची नावेही वेगवेगळी आहेत.4 / 7संस्कृत भाषेतील खिच्चा या शब्दावरून खिचडी हा शब्द आला आहे. खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात याबाबत अनेकांना कल्पना नाही.5 / 7खिचडीला इंग्रजीत Hotchpotch, Medley, Kedgree असं म्हणतात. साधारणपणे खिचडी या शब्दाला खिचडीच म्हणले जाते. 6 / 7खिचडीला भारताचे प्रमुख अन्न म्हटले तर वावगे ठरणार नाही. शेकडो वर्षांपासून खिचडी भारताच्या प्रत्येक भागात खाल्ली जात आहे7 / 7खिचडी खाल्ल्याने अपचन थांबते, खिचडी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय मधुमेह टाळण्यास मदत होते, वात, पित्ता आणि कफ रोखण्यासाठी खिचडी उपयुक्त आहे यामुळे निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते.