1 / 5मोबाइल आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. पण तो सतत शरीराच्या अगदी जवळ ठेवणं विशेषतः खिशात किंवा झोपताना उशाजवळ ठेवणं योग्य आहे का, हा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत, जी समजून घेणं गरजेचं आहे.2 / 5मोबाइल फोनमधून सतत रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) किरणोत्सर्ग होत असतो. हा किरणोत्सर्ग फार जास्त धोकादायक नसला तरी दीर्घकाळ शरीराच्या खूप जवळ राहिल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो, असं अनेक अभ्यास सूचित करतात. त्यामुळे मोबाइल कायम खिशात ठेवण्यापेक्षा थोडं अंतर ठेवणं अधिक सुरक्षित मानलं जातं.3 / 5झोपताना मोबाइल उशाजवळ ठेवण्याची सवयही अनेकांना असते. पण याचे काही तोटे आहेत. सर्वात मोठा परिणाम म्हणजे झोपेवर होणारा. मोबाइलमधून निघणारा ब्लू लाईट मेंदूला जागं ठेवतो आणि झोपेचं चक्र बिघडवतो. त्यामुळे झोप उशिरा लागते, मध्येच जाग येते किंवा झोप पूर्ण होत नाही.4 / 5तसंच, सतत नोटिफिकेशन्स येत राहिल्यामुळे मेंदू पूर्णपणे रिलॅक्स होत नाही. शरीर झोपलेलं असलं तरी मेंदू सक्रिय राहतो. यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो. याशिवाय काही वेळा मोबाइल गरम होण्याची शक्यता असते. उशीखाली किंवा बिछान्यात ठेवला तर हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे फोन ओव्हरहिट होऊ शकतो. प्रसंगी तो फुटण्याचीही शक्यता असते.5 / 5