By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:17 IST
1 / 10कॅन्सर (Cancer) हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या संशोधनावर आधारीक माहिती समजून घेऊ.2 / 10नॅशनल कॅन्सर इन्टिट्यूटच्या अहवालानुसार कॅन्सर हा फक्त आजार नसून तो शंभरहून अधिक आजारांचा समूह आहे. शरीरातील सेल्युलर मॅकेनिझम बिघडल्यामुळे पेशी नष्ट न होता ट्यूमर तयार करतात. 3 / 10कॅन्सरची सुरूवात पेशींच्या डिएनएमध्ये होणाऱ्या बदलांमुळे होते. जेव्हा हे बदल पेशींना वाढवण्याचे किंवा मरण्याचे संकेत देणाऱ्या जीन्समध्ये बिघाड करतात तेव्हा पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात.4 / 10 जगभरातील कॅन्सरच्या मृत्यूंपैकी सुमारे २२ टक्के मृत्यू हे तंबाखूच्या सेवनानं होतात. यामध्ये फुफ्फुसं, तोंड आणि घशाच्या कॅन्सरचा समावेश आहे.5 / 10 पर्यावरणातील काही घटक जसं की एस्बेस्टॉस, रेडीएशन आणि अतिनील किरणं थेट डीएनएला इजा पोहोचवून कॅन्सरला कारणीभूत ठरतात.6 / 10अतिलठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि प्रक्रिया केलेले अन्न यामुळे शरीरातल दीर्घकाळ दाह राहतो जो कॅन्सरचा धोका वाढवतो.7 / 10 काही प्रकारचे व्हायरस जसं की ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तर हिपॅटायटीस बी आणि सी मुळे यकृताचा कॅन्सर होऊ शकतो.8 / 10सुमारे ५ ते १० टक्के कॅन्सर हे पालकांकडून मुलांकडे येणाऱ्या सदोष जनुकांमुळे होतात. शरीरातील हॉर्मोन्सची पातळी अनियंत्रित झाल्यास स्तन किंवा गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.9 / 10हवेतील प्रदूषण, बेंझिन, आर्सेनिक आणि विशिष्ट रसायनं यांच्या सततच्या संपर्कामुळे कॅन्सर होऊ शकतो.10 / 10 शरीरात अति चरबी साठल्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते आणि इ्फ्लेमेटरी सायटोकाईन्स तयार होतात. जे कॅन्सरच्या पेशींच्या वाढीला खतपाणी घालतात.