1 / 8वयाची तिशी ओलांडली की महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होतात. घराची जबाबदारी, ऑफिसचे काम आणि मुलांची धावपळ या सगळ्यात महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये सतत थकवा येणे, कंबर आणि पाठ दुखणे, केस गळणे आणि अचानक मूड खराब होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. बरेचदा आपण याला ताण समजून दुर्लक्ष करतो. पण आपल्यासोबत असं का होते हे अनेकांना माहित नसते. 2 / 8आपल्या शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमी झाल्यास ही लक्षणे आपल्याला दिसू लागतात. हे जीवनसत्त्व आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे चिडचिड वाढते. अशावेळी आहारात किंवा आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल करणे फार महत्त्वाचे आहे. शरीरातील बी१२ ची पातळी नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काय खायला हवे पाहूया. 3 / 8महिलांनी रोज एक ग्लास कोमट दूध किंवा एक वाटी दही खायला हवे. ज्यामुळे शरीराला आवश्यक तेवढे बी १२ आणि कॅल्शियम मिळते, ज्यामुळे पाठदुखी-कंबरदुखीचा त्रास कमी होईल. 4 / 8जर आपण नॉन व्हेज खात असू तर अंड्यातील पिवळा भाग खा. रोज सकाळी उकडलेले अंडे खाल्ल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढून थकवा दूर होतो. 5 / 8इडली, डोसा किंवा ढोकळा यांसारखे आंबवलेले पदार्थ आणि मोड आलेली कडधान्ये यात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन बी १२ तयार होते. यामुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे आळस दूर होतो. 6 / 8शाकाहारी लोकांसाठी मशरुम हा एक चांगला पर्याय आहे. आठवड्यातून दोन वेळा ही भाजी किंवा सूपच्या माध्यमातून खाल्ल्याने रक्ताची कमतरता भरुन निघते. 7 / 8वर्किंग वुमनसाठी फोर्टिफाइड फुड्स, ओट्स, कॉर्नफ्लेक्स किंवा कडधान्ये नाश्त्याला खा. ज्यामुळे शरीराला दिवसभर अॅक्टिव्ह ठेवतो आणि मूड चांगला राखण्यास मदत करतो. 8 / 8तसेच आपल्या रोजच्या जीवनशैलीत आपण योगासने, योग्य आहार, भरपूर पाणी देखील प्यायला हवे.