Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात मांड्या घासल्या जातात-चालायला त्रास होतो? ८ उपाय करा, मांड्यांची आग होणं थांबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 21:27 IST

1 / 8
उन्हाळ्यात मांड्या घासल्या जाणाच्या त्रास टाळण्याासठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता. उन्हाळ्यात घट्ट किंवा सिंथेटिक कपडे टाळून नेहमी सुती आणि सैल कपडे वापरावेत जे घाम व्यवस्थित शोषून घेतात. (Thigh Chafing Inner Thigh Chafing And How Do I Treat It)
2 / 8
चालताना मांड्याचे थेट घर्षण टाळण्यासाठी पँटच्या आत सुती लाँग लेग शॉटर्स किंवा सायकलिंग शॉर्ट्स घालणं प्रभावी ठरतं. (How To Deal With Inner Thigh Chafing)
3 / 8
घामामुळे ओलावा निर्माण होऊन त्वचा लवकर सोलली जाते. त्यामुळे तो भाग नेहमी कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा.
4 / 8
घराबाहेर पडण्यामुळे मांड्यांना आतल्या बाजूला नारळाचं तेल किंवा तुमच्या त्वचेला सूट होणारं एखादं पावडर लावा.
5 / 8
घाम जास्त येत असल्यास एंटी फंगल किंवा साधी टॅल्कम पावडर लावल्यानं त्वचा कोरडी राहण्यास मदत होते.
6 / 8
बाहेरून आल्यावर तो भाग कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा. जेणेकरून घामातील क्षार निघून जातील आणि जळजळ थांबेल.
7 / 8
अंघोळीसाठी तीव्र वासाचे किंवा केमिकल्स असलेले साबण टाळा. त्याऐवजी सौम्य साबण वापरा. जेणेकरून त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहील.
8 / 8
जर त्वचा सोसली गेली असेल तर थंड पाण्यानं त्वचा आधी शेका त्यानंतरच कोणतंही क्रिम लावा.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल