Join us

एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 18:23 IST

1 / 8
झोप ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर नीट झोप पूर्ण झाली नाही तर संपूर्ण दिवस आळस असतो. पण काही वेळा एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर झालं तरी झोप येतच नाही. खूप वेळ जागं राहावं लागतं.
2 / 8
काही सोप्या सवयी आपली झोप सुधारू शकतात. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील न्यूरोसायन्स आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मॅथ्यू वॉकर, ज्यांनी Why We Sleep हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे, त्यांनी अशा ६ टिप्स दिल्या आहेत ज्या झोपेची गुणवत्ता बदलू शकतात.
3 / 8
डॉ. वॉकर म्हणतात, जर तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बेडवर जागे असाल, तर पुस्तक वाचा किंवा पॉडकास्ट ऐका. टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीन टाळा.
4 / 8
रात्री १० मिनिटं मेडिटेशन केल्याने मन शांत होतं आणि ताण कमी होतो. डॉ. वॉकर स्वतः दररोज रात्री मेडिटेशन करतात. ही सवय निद्रानाश कमी करते आणि चांगली झोप लागते.
5 / 8
झोपेच्या वेळेमध्ये नियमितता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आठवड्याचा शेवट असो किंवा कामाचा दिवस असो, दररोज एकाच वेळी झोपल्यामुळे आणि उठल्यामुळे शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक बॅलेन्स राहतं.
6 / 8
अंधार मेलाटोनिन हार्मोन सक्रिय करतो, जो झोप येण्यास मदत करतो. झोपण्यापूर्वी अर्धा तास घरातील दिवे मंद करा, यामुळे शरीर आपोआप झोपेसाठी तयार होईल.
7 / 8
रुमचं तापमान १८°C च्या आसपास ठेवल्याने शरीराचे मुख्य तापमान कमी होते आणि झोप लवकर येते. थंड वातावरण मन आणि शरीर दोघांनाही आराम देतं.
8 / 8
डॉ. वॉकरच्या मते, अल्कोहोलचा झोपेवर अत्यंत वाईट परिणाम होतो. चांगल्या झोपेसाठी मद्यपानापासून दूर राहा.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य