Join us

या ५ पदार्थांमुळे वाढतो Heart Attack चा धोका, एक्सपर्ट सांगतात- रोजच्या वापरातले ‘हे’ पदार्थ फारच घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 18:40 IST

1 / 7
आजकाल हार्ट अॅटॅकचे प्रमाण फार वाढले आहे. अनेकांना काहीही शारीरिक त्रास नसतानाही हार्ट अॅटॅक येतो. अनेक कारणांमुळे येऊ शकतो. नैसर्गिक आहे, आपल्या हातात काही नाही असे अनेक जण म्हणतात. मात्र आपल्या काही सवयी हार्ट अॅटॅकला कारणीभूत ठरतात.
2 / 7
वेलनेस एक्सपर्ट आणि लेखक डॉक्टर एरिक बर्ग यांनी सांगितल्यानुसार, शरीरातील नायट्रिक अॅसिडची पातळी कमी झाल्यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. शरीरातील नायट्रिक ऑक्साइड कमी करणारे काही पदार्थ आपण रोज खातो. ते खाणे टाळायला हवे.
3 / 7
घरोघरी साखर तर नक्कीच खाल्ली जाते. साखर खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. साखरेतील घटक शरीरातील नायट्रिक ऑक्साइड कमी करते. त्यामुळे जास्त साखर खाणे टाळायला हवे.
4 / 7
रिफाइंड स्टार्च असलेले पदार्थ खाणे टाळायला हवे. ब्रेड, बिस्किट, पेस्ट्री आदी पदार्थांमध्ये हा पदार्थ भरपूर प्रमाणात असतो. तसेच मेटाबॉलिझमवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळा.
5 / 7
इंडस्ट्रीयल सीड ऑइल जसे की कॉर्न आइल, सोयाबीनचे तेल तसेच फास्ट फूड अशा विविध पदार्थांत असे तेल वापरले जाते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा.
6 / 7
स्मोकींगची सवय संपूर्ण आरोग्यासाठीच फार वाईट असते. त्यामुळे हृदय अगदी कमकुवत होते. त्यामुळे वेळीच अशा सवयी बदला. व्यसनांच्या आहारी जाऊ नका.
7 / 7
एक्सपर्टनी सांगितल्यानुसार, अँटी बॅक्टिरिअल माइथवॉश वापरणे आरोग्यासाठी चांगले नाही. अनेकदा त्यात वापरली जाणारी रसायने शरीरातील नाइट्रिक ऑक्साइड कमी करतात. त्यामुळे रासायनिक माउथवॉश वापरणे टाळा.
टॅग्स : हृदयरोगहेल्थ टिप्सआरोग्यअन्नआहार योजना