1 / 7काही जणांचं हिमोग्लोबिन नेहमीच खूप कमी असतं. त्यात महिलांचं प्रमाण तर खूप जास्त आहे.2 / 7हिमोग्लोबिन कमी असेल तर अशक्तपणा येतो. थोडेही शारिरीक श्रम सहन होत नाहीत. लगेचच गळून गेल्यासारखं वाटतं. हा सगळा त्रास टाळून हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर काही पदार्थ आपल्या आहारात असायलाच हवेत.3 / 7ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉ. स्नेहल यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यापैकी पहिला पदार्थ आहे काळ्या मनुका. रोज रात्री झोपण्यापुर्वी थोड्याशा पाण्यात ७ ते ८ मनुका भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बारीक चावून खा. हिमोग्लोबिन वाढेल.4 / 7रोज १ खजूर नियमितपणे खाल्ल्यासही हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. खजुरातून नॅचरल शुगर मिळत असल्याने एनर्जी लेव्हलही खूप वाढते.5 / 7तिसरा पदार्थ म्हणजे भाजलेले तीळ किंवा फुटाणे गुळासोबत खाणे. गूळ आणि फुटाणे हे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठीचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.6 / 7पालक, बीटरुट, शेवगा या भाज्याही नियमितपणे तुमच्या आहारात असू द्या. या भाज्यांचे वेगवेगळे पदार्थ करून खा. त्यातुनही तुमच्या शरीराची हिमोग्लोबिनची गरज पुर्ण होऊ शकेल.7 / 7हिमोग्लोबिन कमी असेल तर आवळाही नियमितपणे खा. कारण आवळ्यामध्ये असणारं व्हिटॅमिन सी अन्नपदार्थांमधून मिळणारं लोह शरीरात व्यवस्थित शोषून घेण्यास मदत करतं.