ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस, हवा बदल! तब्येत बिघडू नये म्हणून तातडीने करा ५ उपाय

Updated:May 7, 2025 18:50 IST2025-05-07T18:45:49+5:302025-05-07T18:50:15+5:30

sudden change in atmosphere can cause health problems, see what to do : वातावरणात अचानक बदल झाल्यावर पाहा कशी काळजी घ्याल.

ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस, हवा बदल! तब्येत बिघडू नये म्हणून तातडीने करा ५ उपाय

ऋतु चक्र सुरळीत चालणे जेवढे निसर्गासाठी गरजेचे आहे, तेवढेच आपल्या आरोग्यासाठीही गरजेचे आहे. वातावरणात बदल होताना आरोग्यावर परिणाम होतो. आजारपण येते थकवा जाणवतो.

ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस, हवा बदल! तब्येत बिघडू नये म्हणून तातडीने करा ५ उपाय

वातावरणातील अकाली बदल जास्त त्रासदायक ठरतो. उन्हाळ्यात पाऊस पडल्यावर खोकला, ताप आणि इतर प्रकारचे त्रास होतात. साथ पसरते. त्यामुळे कामही करवत नाही आणि काहीच करावेसे वाटत नाही.

ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस, हवा बदल! तब्येत बिघडू नये म्हणून तातडीने करा ५ उपाय

वातावरण बदलायला लागल्यावर काही गोष्टींची काळजी घेतली आणि काही नियम लक्षात ठेवले तर आजारपण टाळता येते. फार काही मोठे करायचे नाही अगदी सोपे उपाय आहेत जे करणे नक्कीच फायद्याचे ठरेल. पाहा काय कराल आणि काळजी घ्या.

ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस, हवा बदल! तब्येत बिघडू नये म्हणून तातडीने करा ५ उपाय

वातावरण बदलताना सगळ्यात आधी पाणी प्यायची सवय बदलायला हवी. उन्हाळ्यात गार पाणी प्यायची सवय झाली असते. पाणी साधेच प्यावे. पाणी उकळून ठेवावे आणि मगच प्यावे. उकळलेले पाणी प्यायल्याने घसा साफ होतो. पोटात जाणारे विषाणू कमी होतात.

ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस, हवा बदल! तब्येत बिघडू नये म्हणून तातडीने करा ५ उपाय

बाहेर जाताना वातावरणाला साजेल असा पेहराव असावा. त्वचेला त्रास होईल असे कापड वापरु नका. कॉटनचे कपडे वापरा. सैल सुटसुटीत कपडे घाला. वारा सुटला असेल तर तोंडाला ओढणी किंवा स्कार्फ बांधा. टोपी घाला.

ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस, हवा बदल! तब्येत बिघडू नये म्हणून तातडीने करा ५ उपाय

जेवणात चांगले पौष्टिक पदार्थच खा. पाऊस पडला की लगेच भजी, वडा खावासा वाटतो. मात्र पाऊस जर अकाली असेल तर त्याचा त्रास पोटाला त्रास होईल. त्यामुळे साधे अन्नच खावे.

ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस, हवा बदल! तब्येत बिघडू नये म्हणून तातडीने करा ५ उपाय

वारा सुटला किंवा पाऊस पडला की सारखे लाईट येतात जातात. त्यामुळे मशीन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे वारा सुटला की आधी फ्रिज, टिव्ही, वायफाय बंद करायचे. मोबाइल व्यवस्थित ठेवायचा.

ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस, हवा बदल! तब्येत बिघडू नये म्हणून तातडीने करा ५ उपाय

लहान मुलांना आजारपण अशा वेळी आधी गाठते. त्यामुळे त्यांची काळजी आधी घ्या. काढा प्यायला द्या तसेच चांगले पौष्टिक पदार्थ खायला द्या. जास्त घराबाहेर जाऊ देऊ नका. शाळेत जातानाही बरोबर औषध देऊन ठेवा. वेळ आली तर घ्यायला शिकवा.