Join us

एका दिवसात किती बदाम खाणं योग्य? भिजवून खावे की तसेच..? पाहा बदाम खाण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:22 IST

1 / 8
साधारणपणे एका निरोगी प्रौढ व्यक्तीनं दिवसाला ५ ते १० बदाम खाणं योग्य मानलं जातं. (How Many Almonds Should You Eat Daily)
2 / 8
एकाचवेळी जास्त बदाम खाऊ नयेत. कारण बदामांमध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. अतिसेवन केल्यास पचायला जड वाटू शकतं. ( What Is Right Way To Eat Almonds)
3 / 8
बदाम भिजवून खाणं हे सर्वोत्तम आहे. रात्रभर भिजवल्यानं बदाम मऊ होतात आणि पचायला सोपे जातात.
4 / 8
भिजवल्यामुळे बदामातील फायटीक एसिड कमी होते. त्यामुळे शरीराला त्यातील पोषक तत्व शोषून घेणं अधिक सोपं जातं.
5 / 8
भिजवल्यानंतर बदामाची तपकिरी त्वचा काढून खाणं अधिक फायद्याचं ठरतं.
6 / 8
कोरडे बदाम लगेच ऊर्जा देतात पण ते पचायला जास्त वेळ घेतात आणि अनेकांना जड वाटू शकतं.
7 / 8
भिजवलेले बदाम सकाळच्या वेळेस नाश्त्यासोबत खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते .
8 / 8
गर्भवती महिला, विशेष आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी बदाम खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच बदामाचे प्रमाण निश्चित करावे.
टॅग्स : अन्नहेल्थ टिप्सआरोग्य