1 / 9खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, झोप पूर्ण न होणे आणि सतत ताण घेतल्यामुळे अगदी लहान वयात मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो. (high blood sugar symptoms)2 / 9मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आरोग्याची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी लागते. कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी त्यांना अनेकदा विचार करावा लागतो. (should diabetics avoid fruits)3 / 9रक्तातील साखर वाढेल का, असा प्रश्न त्यांना वारंवार सतावत असतो. परंतु, काही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास शरीरातील शुगर लेव्हल वाढू शकतो. 4 / 9त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही या ५ फळांचे सेवन करु नका. 5 / 9लिचीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. एकापेक्षा जास्त प्रमाणात लिचीचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते. 6 / 9आंबा तुम्हाला कितीही आवडत असला तरी तो खाऊ नका. यामुळे शरीरातील नैसर्गिक साखरेची पातळी वाढते. कमी प्रमाणात खाल्ल्याने साखरेची पातळी स्थिर राहिल. 7 / 9अननसमध्ये फायबर आणि पोषक तत्व आहे. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढते. 8 / 9द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर अधिक असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढून आरोग्याला हानी होते. 9 / 9कलिंगडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना कलिंगड न खाण्याचा सल्ला दिला जातो.