Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तुमचं डोकं दुखतंय की टाच-पाहा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने कोणता आजार होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 15:45 IST

1 / 7
शरीराला सगळ्याच पोषक घटकांची गरज असते. आहारातून मिळणारी जीवनसत्वे, खनिजे, लोह,आदी सगळ्याचे प्रमाण संतुलित असेल तरच व्यक्ती पूर्णपणे फीट असते. जर एखाद्या सत्वाची कमतरता असेल तर शरीराची कोणती ना कोणती प्रक्रिया मंदावते.
2 / 7
जीवनसत्वे विविध प्रकारची असतात. त्यांची कार्येही वेगळीच. जसे की जीवनसत्त्व ए दृष्टी, वाढ, रोगप्रतिकार शक्ती, आदी गोष्टी व्यवस्थित ठेवण्याचे कार्य करते.
3 / 7
जीवनसत्त्व बी एकच नसून त्याचा समूह असतो. पचनसाठी खास म्हणजे मेटाबॉलिझम चांगले ठेवण्यासाठी हे गरजेचे असते. शरीराला ऊर्जा देणे आणि ती टिकवणे यासाठी या जीवनसत्त्वाची पातळी चांगली असावी लागते.
4 / 7
जीवनसत्त्व सी ची कमतरता अनेकांमध्ये असते. त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी कोलेजन तयार करण्यासाठी या जीवनसत्त्वाची गरज सगळ्यात जास्त असते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही ते महत्त्वाचे आहे.
5 / 7
हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम आणि पोटॅशियम चांगले असणे गरजेचेच. हाडांचे आणि दातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गरजेच्या असणाऱ्या गरजेच्या पोषणांचा पुरवठा जीवनसत्त्व डी करते. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी याची सगळ्यात जास्त गरज असते.
6 / 7
जीवनसत्त्व ई डोळ्यांसाठी, त्वचेसाठी, यकृतासाठी तसेच हृदयासाठी गरजेचे असते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात हे जीवनसत्त्व देणारे पदार्थ हवेच.
7 / 7
जीवनसत्त्व के शरीराचे अत्यंत महत्त्वाचे काम करते ते म्हणजे रक्ताची पातळी आणि शुद्धता सांभाळणे. रक्ताच्या गाठी होऊ नयेत म्हणून हे जीवनसत्त्व अगदी गरजेचं.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीअन्नसोशल व्हायरलफिटनेस टिप्स