उपाशीपोटी अजिबात करु नका या ६ गोष्टी, पित्ताचा त्रास होणार नाही आणि पचनही सुधारेल
Updated:October 28, 2025 11:57 IST2025-10-28T11:47:18+5:302025-10-28T11:57:54+5:30
Never do these 6 things on an empty stomach, you will not have problems with your gallbladder and your digestion will also improve : उपाशीपोटी अजिबात करु नका या गोष्टी.

सकाळी उठल्यावर उपाशीपोटी काही गोष्टी करणे टाळायला हवे. तसेच बरेचदा घाईत आपण नाश्ता करत नाही. काही वेळा उपास असतात तर काही वेळा जेवायला उशीर होतो. कारण काहीही असो उपाशीपोटी किंवा जेवण करुन बराच वेळ झाल्यावर काही गोष्टी करणे टाळा.
सकाळी उठल्यावर कॉफी किंवा चहा प्यायची सवय आहे? उपाशीपोटी चहा-कॉफी पिणे चांगले नाही. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. छातीत जळजळ होते. त्यामुळे सकाळी काहीतरी खाल्याशिवाय चहा किंवा कॉफी पिणे टाळा.
रिकाम्या पोटी अति तिखट खाणे टाळा. सकाळी उठल्यावर किंवा चांगलीच भूक लागली असेल तर पहिला पदार्थ तिखट खाल्ला तर पोटात जळजळ होते आणि पोटाला त्रासही होतो.
चालणे, धावणे किंवा कोणताही व्यायाम असो शारीरिक कसरत करण्याआधी काहीतरी अन्न पोटात असावे. फळ, ज्यूस पौष्टिक नाष्टा असे काहीतरी खाऊनच व्यायाम करा. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे योग्य नाही.
डोकेदुखी, अंगदुखी अशा कोणत्याही त्रासासाठी पेनकिलर घेणे अगदीच सामान्य आहे. मात्र पेनकिलर कधीही उपाशीपोटी घेऊ नको. त्यामुळे त्रास कमी होण्याऐवजी शरीरातील उष्णता वाढते.
संत्र, लिंबू, अननस सारखी आम्लयुक्त फळं खाणे आरोग्यासाठी चांगली असली तरी उपाशीपोटी खाणे टाळा. पोटातील आम्ल वरच्या दिशेने येते आणि त्यामुळे पोटात दुखते तसेच मळमळते.