1 / 7जेव्हा घरी एखादी झणझणीत भाजी केली जाते किंवा डाळ बट्टी, पिठल्यासारख्या खमंग पदार्थांचा बेत असतो तेव्हा आपोआपच तोंडी लावायला कच्चा कांदा घेतला जातो. 2 / 7रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावरही आपण आवर्जून कच्चा कांदा तोंडी लावायला मागून घेतो. कारण त्यामुळे जेवणाची चव आणखी खुलते. जेवणाला रंगत येते आणि साधी भाजी, आमटीही खमंग लागू लागते. सध्या तर उन्हाळ्याचे दिवस असल्याने कित्येक जण कच्चा कांदा रोजच तोंडी लावायला घेतात. पण यामुळे आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का3 / 7एक्सपर्ट असं सांगतात की जर तुम्ही जेवणात कच्चा कांदा घेतला तर त्यामुळे शरीरात पाचक रस चांगल्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे आपण जे काही खातो ते खूप चांगल्या प्रकारे पचतं..4 / 7कच्च्या कांद्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतात. हे फायबर अन्नामधले पौष्टिक घटक रक्तात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यास मदत करतात.5 / 7जेवणात जर नियमितपणे कच्चा कांदा घेतला तर त्यामुळे रक्ताभिसरणही अधिक चांगलं होतं.6 / 7पचनासाठी आवश्यक असणारे जे चांगले बॅक्टेरिया असतात त्यांच्या पोषणासाठीही कांद्यातील काही घटक मदत करतात. त्यामुळे अन्नपचन जास्त चांगलं होतं.7 / 7पण जर तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास असेल किंवा रक्त पातळ होण्याची औषधी तुम्ही घेत असाल तर मात्र डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच कांदा तोंडी लावावा.शिवाय रात्रीच्या वेळीही कच्चा कांदा खाणे टाळायला हवे.