Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दात किडणं म्हणजे मोठं दुखणं, चिमूटभर हळदीत ‘हा’ पदार्थ घालून दात घास-दात ठेवा स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:58 IST

1 / 10
दातांना किड लागणं ही खूपच कॉमन समस्या आहे. दातांना किड लागली की वेदनासुद्धा जाणवतात तर डेंटिस्टकडून ट्रिटमेंट घेण्यात हजारो रूपये जातात. (Turmeric Remedies For Tooth Dacay And Cavities)
2 / 10
हळदीत नैसर्गिक एंटी बॅक्टरिअल आणि एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. दातांची किड आणि त्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. (How To Treat Tooth Cavities Naturally With Turmeric)
3 / 10
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा मुख्य घटक असतो जे दातांमध्य कीड निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करतो.
4 / 10
एक छोटा चमचा हळद पावडरमध्ये थोडं मोहोरीचं तेल मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट कीड लागलेल्या दातांवर लावा.
5 / 10
हळद पावडरमध्ये चिमूटभर सैंधव मीठ आणि साधं मीठ आणि थोडं पाणी मिसळून घासल्यानं दातांवरील पिवळेपणा आणि कीड कमी होते.
6 / 10
किड लागल्यामुळे हिरड्यांना आलेली सूज आणि दातदुखी कमी करण्यासाठी हळदीची पेस्ट लावल्यानं त्वरीत आराम मिळतो.
7 / 10
कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद घालून त्या पाण्यानं गुळण्या केल्यास तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि जंतू मरतात.
8 / 10
झोपण्यापूर्वी हळदीची पेस्ट कीड लागलेल्या ठिकाणी लावून १० ते १५ मिनिटं तसंच ठेवा नंतर कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा.
9 / 10
हळदीतील एंटी ऑक्सिडेंट्स गुणधर्म दातांमधील कॅव्हिटीज अधिक खोल होण्यापासून वाचवतात आणि इन्फेक्शन पसरू देत नाहीत.
10 / 10
हळद आणि लवंगाचे तेल एकत्र करून लावल्यास दातांची मुळं मजबूत होतात आणि दातांची संवेदनशीलता कमी होते.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल