Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मुलींना लवकर पाळी येण्याची ५ कारणं- 'या' गोष्टींपासून मुलींना दूर ठेवा, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 09:40 IST

1 / 8
हल्ली मुलींचं पाळी येण्याचं वय बरंच अलीकडे आल्यासारखं झालं आहे. अगदी चौथी पाचवीमधल्या मुलींना पाळी येत आहे. आपल्या लेकीसोबत हे होऊ द्यायचं नसेल तर काही गोष्टी अगदी कटाक्षाने करा, असं डॉक्टर सांगत आहेत.
2 / 8
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे मुलगी २ वर्षांची झाल्यानंतर तिला खूप जास्त दूध देऊ नका. दिवसाला मध्यम आकाराचा १ कप एवढं दूध पुरेसं आहे.
3 / 8
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी देणं, शाळेसाठी प्लास्टिकचा डबा देणं टाळा. यातून निर्माण होणारे केमिकल्स पोटात जातात आणि हार्मोन्सचं संतुलन बिघडवून टाकतात.
4 / 8
घरातले वाद, भांडणं यापासून मुलींना दूर ठेवा. यामुळे त्यांच्या शरीरातला स्ट्रेस हार्मोन वाढतो. त्यामुळे त्या लवकर वयात येऊ शकतात.
5 / 8
मुलींना कॅफिनयुक्त पदार्थ देऊ नका. म्हणजेच कॉफी, कोल्ड कॉफी आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंक्सपासूनही त्यांना दूर ठेवा.
6 / 8
मुली टीव्हीवर, मोबाईलवर काय पाहात आहेत याकडे लक्ष ठेवा. अडल्ट कंटेंटपासून त्यांना दूर ठेवा. कारण यामुळे मेंदू ओव्हर स्टिम्युलेट होतो आणि शरीरातलं हार्मोन्सचं संतुलन बिघडतं.
7 / 8
परफ्युम, इतर केमिकल्स असणारे सुगंध, नेलपेंट, लिपस्टिक अशा केमिकल्स असणाऱ्या कॉस्मेटिक्सपासून मुलींना दूर ठेवा.
8 / 8
मुलींचं मैदानी खेळ खेळण्याचं प्रमाण वाढवा. मैदानी खेळांमुळे किंवा योगा, जिमनॅस्टिक, स्विमिंग, सायकलिंग अशा खेळांमुळे हार्मोन्सचे संतुलन राहण्यास मदत होते.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यलहान मुलं