Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पोट साफ होण्यासाठी ३ साध्या- सोप्या टिप्स, सकाळी उठताच पोट साफ होऊन लगेच फ्रेश वाटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2026 16:23 IST

1 / 6
सकाळी उठल्यानंतर कित्येक लोकांना अर्धा ते पाऊण तास टॉयलेटमधेच थांबावं लागतं, कारण पोट साफ होतच नाही. पोट साफ झालं नाही तर लगेच अस्वस्थ वाटायला लागतं.(how to get rid of constipation?)
2 / 6
म्हणूनच पुढे सांगितलेले सोपे उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा. यामुळे पोट लवकर साफ होण्यास नक्कीच मदत होईल.(simple home hacks to reduce constipation)
3 / 6
पहिला उपाय म्हणजे रोज अडीच ते तीन लीटर पाणी प्या. तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलात तर पोट नक्कीच लवकर साफ होईल. तसेच आहारात कोरडे पदार्थ घेणं टाळा. कुस्करून पातळ केलेले पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या.
4 / 6
आहारात फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असू द्या. त्यासाठी तुमच्या रोजच्या जेवणात सलाडचं प्रमाण वाढवा. याशिवाय ताजी फळंही रोज खा. यामुळे पाेट लवकर साफ होते आणि गॅसेसचा त्रास कमी होतो.
5 / 6
इसबगोल देखील पोट साफ होण्यास खूप उपयुक्त ठरतं. त्यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात १ टीस्पून इसबगोल घालून प्यावे.
6 / 6
सकाळी उठल्यानंतर १ ग्लास कोमट पाण्यात १ टीस्पून तूप घालून प्या. पोट लवकर साफ होईल.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नहोम रेमेडीपाणी