1 / 7काही जणांना पोट साफ व्हायला नेहमीच खूप अडचण होते. बराच वेळ टॉयलेटमध्ये घालवूनही पोट व्यवस्थित साफ होतच नाही.(how to get rid of constipation?)2 / 7यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीही कारणीभूत आहेतच. त्यासाठी योग्य आहार घेणे, पाणी योग्य प्रमाणात पिणे, आहारात पातळ पदार्थ जास्त प्रमाणात असणे, असे काही साधेसोपे उपाय करून पाहू शकता.3 / 7पण तरीही तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होत नसेल तर रामदेव बाबा यांनी सांगितलेले काही घरगुती उपाय करून पाहा..(Ramdev baba suggests 3 simple home hacks to get rid of indigestion and constipation)4 / 7हा उपाय रामदेव बाबा यांनी त्यांच्या सोशल मिडिया पेजवर शेअर केला असून यामध्ये त्यांनी काही फळं एका विशिष्ट पद्धतीने खायला सांगितली आहे. ती फळं जर तुम्ही ते सांगत आहेत त्या पद्धतीने खाल्ली तर तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास नेहमीसाठीच जाऊ शकतो.(3 fruits that helps for better digestion)5 / 7त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे नाशपाती हे फळ बारीक चावून चावून खाणे किंवा त्याचा १ ग्लास ज्यूस पिणे. नाशपाती हे बद्धकोष्ठतेचा नाश करणारं फळ आहे असं रामदेव बाबा सांगतात.6 / 7बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणारं आणखी एक फळ म्हणजे पेरू. पेरूवर काळं मीठ किंवा सैंधव मीठ घालून घ्या. ते पोटासाठी जास्त चांगलं ठरतं.7 / 7गावरान आंबे खाल्ल्यानेही बद्धकोष्ठतेचा त्रास खूप कमी होतो. पण मधुमेह असणाऱ्या लोकांनी मात्र आंबे जपूनच खावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.