Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शरीरातलं घातक युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्याचे ७ उपाय; हाडं-मसल्स राहतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 21:30 IST

1 / 7
शरीरात वाढलेलं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी दिवसाला कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. युरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. (How To Control Uric Acid)
2 / 7
साखर आणि फ्रुक्टोज कमी करा जसं की सॉफ्ट ड्रिंक्स, ज्यूस यांसारख्या पदार्थांमुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढतं. (7 Easy Ways To Control Uric Acid)
3 / 7
जास्त वजनामुळे युरिक अ‍ॅसिड वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणून वजन नियंत्रणात ठेवा.
4 / 7
रोज चालणं,योगा किंवा हलका व्यायाम केल्यानं पातळी नियंत्रणात राहते. म्हणून शारिरिक हालचाल जास्तीत जास्त ठेवा.
5 / 7
दूध, दही यांसारखे पदार्थ युरिक अ‍ॅसिड वाढवतात म्हणून आहारात लो फॅट डेअरी पदार्थांचा समावेश करा.
6 / 7
खूप वेळ न खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक एसिड वाढतं. म्हणून जास्तवेळ उपाशी राहणं टाळा. उपवास करत असाल तर शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
7 / 7
पॅकेज्ड आणि जंक फूड युरिक अ‍ॅसिड वाढवते, म्हणून प्रोसेस्ड फूड खाणं टाळा. पॅकेज्ड आणि जंक फूड खाल्ल्यानं तब्येतीच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल