Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थायरॉईडचा त्रास असेल तर खाण्यापिण्याची ७ पथ्ये पाळाच, आजार नियंत्रणात ठेवायचा तर.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 14:25 IST

1 / 9
१. कोणत्याही प्रकारच्या थायरॉईडचा त्रास असेल तरी तो नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार घेतलेली औषधी आणि आहारातली काही पथ्ये पाळणे गरजेचे ठरते. म्हणूनच थायरॉईडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींचा आहार कसा असावा, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती.
2 / 9
२. ही माहिती इन्स्टाग्रामच्या smriti.yoga या पेजवर शेअर करण्यात आली असून यामध्ये थायरॉईडचा त्रास असेल तर कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत, हे सांगण्यात आले आहे.
3 / 9
३. थायरॉईडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी सोयाबीन खाणे टाळावे.
4 / 9
४. त्याचप्रमाणे पत्ताकोबी, फुलकोबी या भाज्याही खाऊ नयेत. या भाज्यांमुळे हार्मोन्सची पातळी बिघडते.
5 / 9
५. थंड पाणी पिणे आणि प्रोसेस्ड फूड खाणे या गोष्टीही कटाक्षाने टाळाव्या.
6 / 9
६. कच्चा कांदा आहारात नियमितपणे खावा.
7 / 9
७. खोबरं नारळ पाणी किंवा नारळाचं दूध या गोष्टी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आहारात असाव्या.
8 / 9
८. दररोज सकाळी नियमितपणे ४ ते ५ भिजवलेले अक्रोड खावेत.
9 / 9
९. अर्धा चमचा धणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी १ लीटर पाण्यात ते १५ मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी नाश्ता करण्याच्या ४५ मिनिटे आधी प्या.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नआहार योजना