Join us
Daily Top 2 Weekly Top 5

बीपी कंट्रोलमध्ये नाही, गोळ्या घ्या पण त्यासोबत बदला ५ साध्या सवयी, टळेल हार्ट अटॅकचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2026 16:16 IST

1 / 7
सध्याच्या धावपळीच्या जगात अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अनेकांना बीपीचा त्रास होणं ही सामान्य समस्या बनली आहे. अनेकदा नियमितपणे औषधे घेऊनही अनेकांचा बीपी नियंत्रणात येत नाही. अशावेळी सतत डोके जड होणे, चक्कर येणे, गरगरणे, छातीत धडधडणे आणि अस्वस्थता वाटणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरु शकते. (Home remedies for high blood pressure)
2 / 7
अचानक बीपी वाढल्याने हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. फक्त औषधांवर अवलंबून न राहता, आपल्या रोजच्या दिनचर्येतील काही चुकीच्या सवयी बदलणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या रोजच्या जीवनशैलीत कोणते बदल करायला हवे पाहूया. (Ways to reduce sodium intake for hypertension)
3 / 7
आपण रोजच्या जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करायला हवे. पापड, लोणचे, फरसाण आणि पॅकेज्ड फूड्स जास्त खात असाल तर यात मीठाचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो. सोडियम शरीरात पाणी साठवून ठेवते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. यासाठी मिठाचे प्रमाण मर्यादित असायला हवे.
4 / 7
रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, जागरण करणे किंवा कमी झोप घेतल्याने चिडचिड आणि सततचा ताण वाढतो. ज्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते. रोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेतल्याने आणि ध्यान केल्याने हृदय शांत राहते आणि बीपी देखील वाढत नाही.
5 / 7
ऑफिसमध्ये तासंतास एकाच जागी बसल्याने किंवा शारीरिक हालचाली न केल्याने वजन वाढते आणि रक्तवाहिन्या कडक होतात. यासाठी रोज ३० मिनिटे वेगाने चाला. सायकलिंग किंवा योगासने केल्याने हृदयाची कार्यक्षमता सुधारेल.
6 / 7
आपल्यापैकी अनेकांना दिवसभरात भरपूर चहा पिण्याची सवय असते. तसेच मद्यपान किंवा धूम्रपान केल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे बीपी अचानक शूट होतो. यासाठी चहा-कॉफीचे प्रमाण कमी करा. आहारात भरपूर पाणी किंवा नारळ पाणी प्यायल्याने अस्वस्थता कमी होते.
7 / 7
आहारात पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. मैद्याचे किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा. हिरव्या पालेभाज्या, पालक, डाळिंब आणि नारळपाणी यांचा आहारात समावेश करा.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना