Join us

गॅसेस आणि ॲसिडिटीला कंटाळलात? स्वयंपाकघरातील ‘हे’ ६ पदार्थ करतात त्रास कमी, पाहा घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 18:34 IST

1 / 9
सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे पोटांत गॅस होणे आणि अ‍ॅसिडिटी (Home remedies for gas & acidity) ही एक कॉमन समस्याच झाली आहे. गॅस आणि अ‍ॅसिडिटी झाल्यास आपल्याला बेचैन वाटू लागते.
2 / 9
पोटात गॅस आणि आम्लाचे प्रमाण जास्त वाढल्याने (Home Remedies To Treat Gas & Acidity Problem) पोटात जळजळ, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे किंवा छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवतात.
3 / 9
गॅस, अ‍ॅसिडिटी झाल्यास आपण वेगवेगळ्या प्रकारची (Home Remedies To Deal With Gas & Acidity Problem) औषध, सिरप, गोळ्या घेतो, परंतु आपण या वारंवार होणाऱ्या गॅस, अ‍ॅसिडिटीवर काही इन्स्टंट घरगुती उपाय देखील करू शकतो. या उपायांच्या मदतीने तुम्हाला काही मिनिटांतच गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळू शकतो.
4 / 9
गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये ओवा खाणे अधिक फायदेशीर ठरते. ओव्यांमध्ये गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या कमी करण्याचे खास गुणधर्म असतात. अर्धा चमचा ओवा मीठासोबत चावून खा आणि कोमट पाणी प्या किंवा आपण ओव्याचे पाणी देखील पिऊ शकता.
5 / 9
जर तुम्हाला गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या सतावत असेल तर तुम्ही लिंबू आणि मधाचे एकत्रित मिश्रण घेऊ शकता. मध लिंबाचे मिश्रण तुम्हाला गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून आराम देऊ शकते.
6 / 9
पोटातील गॅस व अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी हिंग फायदेशीर ठरते. चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिसळून प्या किंवा हिंगाचा लेप नाभीभोवती लावल्याने देखील गॅस व अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.
7 / 9
गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने खूप उपयुक्त आहे. पुदिन्यामध्ये गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या कमी करण्याचे गुणधर्म आहेत. जर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही पुदिन्याची पाने चावून खाऊ शकता किंवा पुदिन्याचा रस पिऊ शकता. थोड्याच वेळात तुम्हाला आराम मिळेल.
8 / 9
भाजलेल जिरं वाटून त्याची पावडर करा. त्यात थोडंसं मीठ घालून कोमट पाण्यासोबत प्या किंवा जिरं पाण्यात उकळून ते पाणी प्या. गॅस, अ‍ॅसिडिटी पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्यांवर झटपट आराम मिळेल.
9 / 9
काळे मीठ गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळ्या मीठात गॅस आणि आम्लता कमी करण्याचे उत्तम गुणधर्म आहेत. गॅस, अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून लवकर आराम मिळवण्यासाठी तुम्ही पाण्यात काळे मीठ मिसळून ते पिऊ शकता.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सहोम रेमेडी