Home Remedies For Acidity : अॅसिडीटीने हैराण आहात? करुन पाहा ४ घरगुती उपाय, अॅसिडीटी होईल कमी

Published:June 5, 2022 03:29 PM2022-06-05T15:29:02+5:302022-06-05T15:35:53+5:30

Home Remedies For Acidity : औषधगोळ्या घेण्यापेक्षा अॅसिडीटी झाल्यावर घरगुती उपाय करणे केव्हाही फायद्याचेच...

Home Remedies For Acidity : अॅसिडीटीने हैराण आहात? करुन पाहा ४ घरगुती उपाय, अॅसिडीटी होईल कमी

अॅसिडीटी ही पचनाशी निगडीत समस्या असून आपली जीवनशैली हे यामागील मुख्य कारण आहे. अपुरी झोप, ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या पद्धती आणि पचनाशी निगडित तक्रारी यांमुळे आपल्याला अनेकदा अॅसिडीटी झाल्याचे दिसते (Home Remedies For Acidity). उन्हाळ्याच्या दिवसांत तर वातावरणामुळे हा त्रास जास्त होत असल्याने अनेक जण हैराण असतात.

Home Remedies For Acidity : अॅसिडीटीने हैराण आहात? करुन पाहा ४ घरगुती उपाय, अॅसिडीटी होईल कमी

एकदा अॅसिडीटी झाली की काय करावे ते आपल्याला काही केल्या कळत नाही. मग डोके ठणकणे, उलट्या, पोटात होणारी जळजळ या समस्या उद्भवतात. अॅसिडीटीमुळे जीवाची होणारी कालवाकालव फारच अस्वस्थ करणारी असते. अशावेळी अन्नाचा वासही सहन होत नाही. एकदा नीट झोप झाली की मगच ही अॅसिडीटी कमी व्हायची शक्यता असते.

Home Remedies For Acidity : अॅसिडीटीने हैराण आहात? करुन पाहा ४ घरगुती उपाय, अॅसिडीटी होईल कमी

अॅसिडीटी झाली की घे गोळी असे करणारे आपल्या आजुबाजूला अनेक जण असतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारे मेडीकलमधून गोळ्या औषधं आणणे आणि ती वारंवार घेत राहणे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नसते. सततच्या पित्तशामक गोळ्यांचा किडणी, हृदय, मेंदू यांवर परिणाम होतो. तसेच दिर्घकाळ एखादे औषध घेतल्यास शरीर इतर औषधांना प्रतिसाद देणे कमी करते. त्यामुळे असे औषधोपचार शक्यतो टाळायला हवेत.

Home Remedies For Acidity : अॅसिडीटीने हैराण आहात? करुन पाहा ४ घरगुती उपाय, अॅसिडीटी होईल कमी

अॅसिडीटी झाल्यावर गोळ्या औषधे घेण्यापेक्षा काही सोप्या उपायांनी हा त्रास कमी होण्याची शक्यता असते. आता हे उपाय कोणते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. बडिशोप ही आपण अन्नपचनासाठी खातो. पण अॅसिडीटीचा त्रास कमी होण्यासाठीही बडीशोपचा अतिशय चांगला उपयोग होतो. बडीशोप खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास छातीत आणि पोटात होणारी जळजळ कमी होण्यास उपयोग होतो.

Home Remedies For Acidity : अॅसिडीटीने हैराण आहात? करुन पाहा ४ घरगुती उपाय, अॅसिडीटी होईल कमी

गुळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही घटक चांगल्या प्रमाणात असतात. अपचन कमी होण्यास आणि पीएच बॅलन्स ठेवण्यास या दोन्हीचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर गुळाचा एक खडा आवर्जून खायला हवा. यामुळे पचनाशी निगडीत तक्रारी दूर होण्यास नक्कीच मदत होते.

Home Remedies For Acidity : अॅसिडीटीने हैराण आहात? करुन पाहा ४ घरगुती उपाय, अॅसिडीटी होईल कमी

काळे जीरेआपण रोजच्या स्वयंपाकात जास्त वापरत नाही. पण अॅसिडीटीसाठी काळे जीरे अतिशय उपयुक्त असतात. हे जीरेचावून खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो. इतकेच नाही तर एक ग्लास पाण्यात काळे जीरे घालून ते उकळावे आणि त्याचा अक्र उतरल्यावर हे पाणी प्यावे. यामुळे अॅसिडीटीपासून आराम मिळण्यास मदत होते.

Home Remedies For Acidity : अॅसिडीटीने हैराण आहात? करुन पाहा ४ घरगुती उपाय, अॅसिडीटी होईल कमी

पचनाच्या तक्रारींवरील रामबाण उपाय म्हणून ओवा खाणे अतिशय चांगले असते. खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचल्याने जळजळ आणि अॅसिडीटीसारख्या तक्रारी उद्भवतात. मात्र ओवा खाल्ल्याने शरीरात तयार झालेले आम्ल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अॅसिडीटीवर ओवा खाणे हा उत्तम उपाय ठरु शकतो.

Home Remedies For Acidity : अॅसिडीटीने हैराण आहात? करुन पाहा ४ घरगुती उपाय, अॅसिडीटी होईल कमी

याबरोबरच जास्त तिखट, मसालेदार, तेलकट तसेच जंक फूड न खाणे हा अॅसिडीटी कमी करण्यावरील एक उत्तम उपाय आहे. व्यायाम करणे, जागरण टाळणे आणि ताणतणावांपासून दूर राहिल्यास अॅसिडीटीचा त्रआस नक्कीच कमी होऊ शकतो.