घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 16:28 IST
1 / 8पावसाळ्यात घशात खवखवणे आणि खोकला येणे सामान्य आहे. मात्र काम करताना किंवा बोलताना खूप त्रास होतो. बरेचदा लोक औषध घेतात, पण काहीच फायदा होत नाही. 2 / 8काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येवर सहज मात करू शकता. घरच्या घरी काही सोपे उपाय करून घशातील खवखव, खोकला कमी होऊ शकतो.3 / 8आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात जे घशातील सूज आणि घशातील खवखव यावर त्वरित आराम देतात. आल्याचा चहा कफ कमी करतो आणि घशाला आराम देतो.4 / 8मधाला नैसर्गिक कफ सिरप म्हणतात. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे घशातील खवखव कमी करतात आणि आराम देतात.5 / 8कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करणं हा घशासाठी रामबाण उपाय आहे. यामुळे घशातील खवखव लगेच बरी होते आणि कफ काढून टाकण्यास मदत होते.6 / 8लसूणमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म घशातील संसर्ग दूर करतात. ते खाल्ल्याने किंवा उकळलेले पाणी प्यायल्याने घसा खवखवणे आणि खोकला या दोन्हीपासून आराम मिळतो.7 / 8घसा खवखवणे आणि खोकल्यासाठी तुळस खूप फायदेशीर आहे. तुळशीचा चहा प्यायल्याने किंवा त्याची पाने उकळल्याने घशात त्वरित आराम मिळतो.8 / 8हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. गरम हळदीचे दूध प्यायल्याने घसादुखी आणि घशातील खवखव लवकर बरी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.