Women Health: प्रायव्हेट पार्टवरचे केस काढून टाकावेत का? डॉक्टर सांगतात, चुकीच्या माहितीमुळे इन्फेक्शनचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:39 IST
1 / 8सध्याचे युग हे जाहिरातींचे युग असल्याने प्रत्येक जण आपले प्रोडक्ट विकण्यासाठी जुन्या गोष्टी वाईट आणि आधुनिक किंवा पाश्चात्य गोष्टी चांगल्या याची जाहिरात करत आहे. त्याचा प्रभाव पडून अनेक जण गोंधळलेल्या स्थितीत आढळतात. 2 / 8अशातच जेव्हा प्रश्न येतो आरोग्याचा, तेव्हा हलगर्जीपणा करून चालत नाही. किंवा अर्धवट माहिती घेऊन शरीरावर प्रयोग करणेदेखील अपायकारक ठरू शकते. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते. 3 / 8वास्तविक पाहता प्युबिक हेअर काढावेत की नाही, याबाबत आरोग्याच्या दृष्टीने विचार करता डॉक्टर सांगतात, हे केस कशासाठी असतात? त्यामुळे घाणेरडा वास येतो का? संसर्ग होतो का? ते केस काढणे अथवा ठेवणे शरीरासाठी हानिकारक आहे का? याची माहिती घेणे आवश्यक आहे. 4 / 8जाहिरातीच्या माध्यमातून अथवा हॉलिवूड, बॉलिवूड स्टार्सच्या माध्यमातून बिकिनी हेअर चांगले नाहीत हे बिंबवले गेले आहे. ज्यामुळे प्युबिक हेअरचा संबंध सौंदर्याशी जोडला गेला आहे, जो सर्वार्थाने चूक आहे. तसे करणे शरीरास अपायकायक ठरू शकते. 5 / 8आपल्या शरीराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्णरित्या आहे. त्यात प्रत्येक भाग असण्यामागे विशिष्ट हेतू आहे. प्युबिक हेअरसुद्धा गुप्तांगाची संरक्षक भिंत आहेत. त्यामुळे घाण, बॅक्टेरिया आणि धूळ आत जात नाही आणि योनी व इतर संवेदनशील भाग संसर्गापासून सुरक्षित राहतात. या केसांमुळे, गुप्तांगांचे तापमान देखील संतुलित राहते आणि त्वचा घर्षणापासून देखील संरक्षित राहते. जेव्हा तुम्ही घट्ट कपडे घालता किंवा शारीरिक संबंधाच्या दरम्यान होणाऱ्या घर्षणापासून. हे केस त्वचेचे संरक्षण करतात.6 / 8प्युबिक हेअर पूर्णपणे काढून टाकणे योग्य नाही. बरेच लोक रेझर, हेअर रिमूव्हल क्रीम किंवा केमिकल्स असलेले लोशन वापरतात, जे त्वचेला नुकसान करतात. यामुळे ऍलर्जी, रॅशेस, स्किन इन्फेक्शन आणि अगदी योनीमार्गाच्या संसर्गाचाही धोका वाढतो. त्यामुळे हे केस पूर्णपणे काढून न टाकता हलके ट्रिम करावेत. यासाठी सेफ्टी क्लिपर किंवा फेदर ट्रिमर वापरा, परंतु केमिकल्स आणि रेझरने केस पूर्णपणे काढून टाकणे टाळा.7 / 8रोज अंघोळ करताना शरीराच्या इतर भागांप्रमाणे गुप्तांगाची स्वच्छताही महत्त्वाची आहे. यासाठी साबण, पावडर, लोशन, रसायन यापैकी कसलीही गरज नाही. तर नुसत्या पाण्याने तुम्ही तो भाग स्वच्छ आणि दुर्गंधविरहित ठेवू शकता. तसे केले नाही तर घाणेरडा वास येऊ शकतो. 8 / 8प्युबिक हेअर काढून टाकणे ही तुमची वैयक्तिक निवड असू शकते, परंतु माहिती नसताना घेतलेला निर्णय तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे संपूर्ण केस काढून न टाकता ते महिन्यातून दोनदा ट्रिम करा आणि रोज पाण्याने ती जागा स्वच्छ धुवा, एवढीच स्वच्छता त्या भागाला निरोगी ठेवण्यास पुरेशी आहे.