धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 18:04 IST
1 / 8आजकाल बहुतेक लोक चष्मा लावतात. डोळे दुखतात, अनेकांना डोळ्यांतून पाणी येतं किंवा जळजळ देखील होते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक असू शकते.2 / 8डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या समस्या मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनकडे जास्त वेळ पाहणे, पौष्टिक गोष्टींची कमतरता किंवा झोपेचा अभाव यामुळे होतात. म्हणून तुम्ही डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.3 / 8बरेच लोक वारंवार संकेत दिसले तरीही या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नंतर ते दृष्टी गमावू शकतात. कोणत्या सवयींमुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकतं ते जाणून घेऊया...4 / 8नॅशनल आय इन्स्टिट्यूटच्या एका रिपोर्टमध्ये असं सूचित केलं आहे की, स्क्रीन टाईममुळे डोळ्यांवर ताण पडतो. शहरातील तरुणांमध्ये ड्राय आईजची समस्या वाढली आहे.5 / 8मेडिकल रिपोर्टनुसार, प्रत्येकजण दिवसातून ६-८ तास त्यांचा मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनकडे पाहत राहतो, सतत स्क्रीन टाईममुळे आपला डोळे मिचकावण्याचा रेट कमी झाला आहे.6 / 8एअर कंडिशनर डोळ्यांसाठी हानिकारक आहे. ते झपाट्याने डोळ्यातील ओलावा कमी करतात, ज्यामुळे डोळे कोरडे होण्याचा धोका ५० टक्क्यांनी वाढतो.7 / 8झोपेचा अभाव हे देखील डोळ्यांच्या समस्यांना कारणीभूत ठरणारं एक कारण आहे. रात्रभर फोन वापरल्याने दृष्टी अंधुक होऊ शकते.8 / 8ओमेगा-३ फॅटी एसिड, व्हिटॅमिन ए आणि कमी पाणी प्यायल्यामुळे देखील डोळे ड्राय होऊ शकतात आणि दृष्टी कमजोर होते. म्हणून, तुमच्या डोळ्यांची जास्तीत जास्त काळजी घ्या आणि स्क्रीनवर जास्त वेळ घालवू नका.