Join us

Health: शरीरात रक्ताची कमतरता आहे हे कसं ओळखावं? पायावरील बदल देतात पूर्वसंकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 14:08 IST

1 / 6
शूज घालून तसेच अंथरुणाने झाकूनही तुमचे पाय गार पडत असतील असतील, तर शरीरात लोहाची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. लोह हेमोग्लोबिन तयार करते, जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन प्रवाही ठेवते. त्याच्या कमतरतेमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो, ज्यामुळे पाय गारठतात. हिरव्या भाज्या, पालेभाज्या, काळे मनुके, चणे, अंजीर इ. पदार्थ खावेत.
2 / 6
पायांमध्ये ताकद न उरणे, वारंवार मुंग्या येणे ही देखील शरीरात रक्त कमी असल्याची लक्षणे आहेत. तसेच व्हिटॅमिन बी१२ चा अभाव आहे हेही दिसून येते. ती उणीव भरून काढण्यासाठी आंबवलेले पदार्थ, मसूर, बीन्स इ. पदार्थांचे सेवन करावे.
3 / 6
थंडी नसूनही टाचांना भेगा पडणे हे बी३ व्हिटॅमिन कमी झाल्याचे लक्षण आहे. शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, मसूर, बीन्स इ. पदार्थांच्या सेवनाने टाचा मुलायम आणि भेगारहित होण्यास मदत होते.
4 / 6
पायात गोळे येणे हे केवळ वाताचे लक्षण नाही तर ती मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. त्यावर उपाय म्हणून कोको तसेच भोपळ्याच्या बिया, पालक, केळी, काजू इ. पदार्थांचे सेवन करावे.
5 / 6
व्हेरिकोज व्हेन असे ज्याला म्हटले जाते, त्या म्हणजे आपल्या पायाला, पोटरीला ताणलेल्या, फुगलेल्या शिरा. यात इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी असल्याचे ते द्योतक आहे. मिरी घातलेला चहा त्यावर गुणाकरी ठरतो. तरीदेखील आहारात तो समाविष्ट करण्याआधी डॉक्टरांची अनुमती घ्या.
6 / 6
काही कारण नसताना सुजलेले पाय, हे रक्त कमी होण्याचे मुख्य चिन्ह आहे. पायाला सूज येणे हे थायरॉईडच्या दृष्टीनेही गंभीर ठरू शकते. अशा वेणी धनेयुक्त पाणी पिणे अतिशय गुणकारी ठरते. पायाची अनावश्यक सूज उतरते आणि रक्ताची कमी पूर्ण होते.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना