केसगळती-अपचनावर हमखास असरदार उपाय; तुळशीची ४ पानं खा-शरीरात होतील चमत्कारिक बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:03 IST
1 / 9तुळस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. दररोज ३-४ पानं खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आजारपणात डॉक्टरही तुळशीची पानं खाण्याचा सल्ला देतात. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...2 / 9तुळस पचनक्रिया निरोगी ठेवते. गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्या कमी करते.3 / 9अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्सने समृद्ध असलेली तुळस शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. शरीरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते.4 / 9तुळस इन्सुलिनची पातळी नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे.5 / 9तुळशीमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा स्वच्छ करते आणि त्वचेवरील डाग देखील कमी होतात. बरेच जण तुळशीच्या फेस पॅकचा वापर करतात. 6 / 9तुळस केसांची मुळं मजबूत करून केस गळण्याची समस्या कमी करते. केसगळतीवर हा रामबाण उपाय आहे. 7 / 9दररोज तुळशीची ३-४ पानं खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होतं आणि हृदयरोगाचा धोका देखील कमी होतो.8 / 9डोकेदुखी कमी करण्यासाठी तुळशीचं सेवन फायदेशीर ठरतं. तुळशीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि पेन रिलीविंग प्रॉपर्टीज आहेत, ज्यामुळे खूप आरामदायी वाटतं. 9 / 9जेव्हा तुम्ही तुळशीची पानं चावता तेव्हा त्यातील गुणधर्म हे वेदनांपासून आराम देतात. यासाठी ३-४ तुळशीची पानं खा. मनालाही आराम मिळेल आणि शरीरातही चमत्कारिक बदल दिसतील.