Join us   

पोटात गॅसेस झाल्यानं डोकं खूप दुखतं, पोट फुगल्यासारखं वाटतं; १० घरगुती उपाय, त्वरीत मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 1:03 PM

1 / 10
जर तुमचं डोकं खूप दुखत असेल तर पोटात तयार होणारा गॅस डोकेदुखीचं कारण असू शकतो. अनेकांना गॅस्ट्रिक त्रास, एसिडिटीमुळे एसिडिटी जाणवू शकते. गॅसमुळे होणारी डोकेदुखी खूप वेदनादायक असू शकते. कारण एकाचवेळी २ समस्या शरीरात उद्भवतात. डॉ. बिपिन जिभकाटे ( वॉकहार्ट हॉस्पिटल, ICU डाइरेक्टर) यांनी एका वेबसाईटशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Gastric headache due to gas causes tr these 5 home remedies)
2 / 10
गॅस्ट्रिक डोकेदुखी अपचन किंवा एसिडीटीमुळे उद्भवते. आपलं पोट आणि डोकं यामध्ये कनेक्शन आहे. खूप लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टिमच्या समस्यांमुळे डोकेदुखीचा सामना करावा लागतो. म्हणजेच शरीराला हव्या त्या प्रमाणत अन्न मिळत नाही. हॅलिकोबॅक्टर पायलोरी इंफेक्शन, इर्रिटेबल बाऊल सिंड्रोम, गॅस, जीईआरडी, गॅस्ट्रोपेरिसिस, इंफ्लेमेटरी बाऊल डिसिज अशा स्थितीत डोकेदुखी उद्भवू शकते.
3 / 10
लिंबूपाणी डोकेदुखीपासून सुटका मिळवण्याचा उत्तम उपाय आहे. कारण यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यानं गॅसमुळे उद्भवणारी डोकेदुखी रोखण्यास मदत होते.
4 / 10
जर पोटात गॅसमुळे डोकेदुखी उद्भवत असेल तर दिवसातून दोनवेळा ताक पिण्याची सवय ठेवा. ताक पिण्याच्या सवयीनं तुम्हाला आराम मिळेल.
5 / 10
डोकेदुखीचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पाणी कमी प्रमाण पिणं. शरीरात पाण्याची कमरता उद्भवल्यास डोकेदुखी जाणवते. रोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या
6 / 10
रोज ७ ते ८ तुळशीची पानं चावल्यानं डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. यामुळे मासपेशींनाही आराम मिळतो. तुळशीच्या पानांमध्ये एनाल्जेसिक गुण असतात. त्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची पानं फायदेशीर ठरतात.
7 / 10
गॅस, एसिड रिफ्लेक्स आणि अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही पेयं पिऊ शकता. जसं की लिंबू पाणी, आल्याचं पाणी, नारळ पाणी, ओव्याचं पाणी आणि बडिशेपेचं पाणी. यामुळे पोटाच्या पेशींना आराम मिळतो.
8 / 10
लसूणाच्या दुधात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे गॅस, पोटाची सूज, अपचन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला हार्ट डिसिज उद्भवत असतील तर तुम्ही लसणाच्या दुधाचे सेवन करू शकता.
9 / 10
पुदिन्यात एंटी इफ्लेमेटरी आणि एंटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे पोटात जाणवणारी जळजळ कमी होण्यास मदत होते.
10 / 10
आपल्या आहारात व्हाईट राईज, ब्राऊन राईज, रेड राईस, पोहे, साबुदाणे, इडली, डोसा या पदार्थांचा समावेश करा. याशिवाय मूगाच्या डाळीचे पदार्थही पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स