1 / 7करिअर आणि मातृत्व यांच्यात या दोन्हीपैकी एक काहीतरी निवडण्याची वेळ प्रत्येक वर्किंग वुमनवर कधी ना कधी येतेच. टॉपच्या अभिनेत्रीही त्याला अपवाद नाहीत. करिअरच्या शिखरावर असताना, हातात बिगबजेट चित्रपट असताना अनेक अभिनेत्रींना गुडन्यूज मिळाली. आणि त्यांनी करिअरपेक्षा आई होण्याला प्राधान्य दिलं2 / 7त्यापैकीच एक आहे दीपिका. आता नुकतीच दीपिका पदुकोनने तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज दिली. सध्या दीपिका आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. 3 / 7मागच्यावर्षी आई झालेल्या आलिया भटचे करिअरही ऐन भरात असताना तिने मातृत्व स्विकारले. पुर्वी लग्न झालं की करिअर संपलं अशी अभिनेत्रींची गत होती. आता मात्र करिअरच्या शिखरावर असतानाही त्या मातृत्वाला प्राधान्य देतात आणि नंतर पुन्हा यशस्वी करिअर करतात, हे खरंच कौतूकास्पद आहे.4 / 7करिना कपूर तर याबाबतीत खरोखरच अनेकींचा आदर्श आहे. दोन मुलांच्या जन्मानंतरही करिनाच्या करिअरची गाडी सुपरफास्ट वेगात धावते आहे.5 / 7'कभी खुशी कभी गम' या सुपरहिट चित्रपटानंतर काजोलने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी दिली होती.6 / 7करिश्मा कपूर जेव्हा तिच्या पहिल्या मुलीच्यावेळी प्रेग्नंट होती, तेव्हा करिश्माच्या हातातही अनेक चांगल्या ऑफर्स होत्या.7 / 7'जुदाई' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं जेव्हा शुटिंग सुरू होतं, तेव्हा श्रीदेवी पहिल्यांदा गरोदर होती.