Join us

जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 17:14 IST

1 / 8
धावपळीच्या आयुष्यात आपण आहाराकडे दुर्लक्ष करतो. असे अनेक पदार्थ आहेत जे खाल्ल्याने तुमचं वजन वाढतं आणि तुम्हाला अजिबात कल्पनाही नसते की या गोष्टी गुपचूपपणे तुमचं वजन वाढवत आहेत.
2 / 8
चमचमीत गोष्टी खाण्याच्या नादात आपण शरीराची नीट काळजी घेत नाही. अनेक गोष्टींमध्ये खूप साखर, हेल्दी फॅट्स आणि रिफाइंड कार्ब्स असतात ज्यामुळे वजन वाढतं.
3 / 8
व्हाईट ब्रेडमध्ये भरपूर प्रमाणात रिफाइंड कार्ब्स असतात आणि त्यात फायबर नसतं. यामुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढते, ज्यामुळे तुमची जेवण्याची इच्छा वाढते आणि जास्त खाल्ल्याने तुमचं वजन वाढू लागतं.
4 / 8
पास्तामध्ये हेवी क्रीम, बटर आणि प्रोसेस्ड केलेले पास्ता असतो. या प्रकारच्या अन्नामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज आणि बॅड फॅट्स असतात, ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.
5 / 8
बॉटलमध्ये पॅक असलेले फळांचे रस, सोडा इत्यादींमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असते. त्यात कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे तुमचं वजन झपाट्याने वाढतं.
6 / 8
तळलेल्या अन्नात ट्रान्स फॅट आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असतं. हे खाल्ल्याने देखील तुमचं वजन झपाट्याने वाढतं.
7 / 8
पिझ्झा, सँडविच आणि पास्ता यांसारख्या पदार्थांमध्ये चीज मोठ्या प्रमाणात मिसळलं जातं. ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकतं.
8 / 8
योगर्ट आरोग्यासाठी आरोग्यदायी चांगलं असतं पण फ्लेवर्ड योगर्टमध्ये साखर आणि कृत्रिम गोष्टींचं प्रमाण खूप जास्त आढळतं. हे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज वाढतात आणि वजनही झपाट्याने वाढतं.
टॅग्स : अन्नआरोग्यहेल्थ टिप्स