पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

Published:October 31, 2023 12:56 PM2023-10-31T12:56:07+5:302023-10-31T13:03:33+5:30

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

बदलत्या लाईफस्टाईलमुळे हल्ली पीसीओडीचा त्रास असणाऱ्या मुलींची- महिलांची संख्या खूप आहे. नियमितपणे व्यायाम केला आणि आहारावर नियंत्रण ठेवले तर हा त्रास नक्कीच नियंत्रणात आणता येतो.

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

म्हणूनच त्यासाठी नेमकी कोणती योगासनं केली पाहिजेत आणि ती किती वेळ करावी याविषयी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या म्हणतात की हा व्यायाम नियमित केल्याने हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रणात राहून पीसीओडीचा त्रास कमी होताे.

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

त्यांनी सांगितलेलं सगळ्यात पहिलं आसन आहे चक्की चलानासन. यामध्ये दोन्ही पाय समोर पसरवा आणि पायांत अंतर घ्या. हात एकमेकांत गुंफून घ्या आणि दळण दळल्याप्रमाणे हातांची गोलाकार हालचाल करा. क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने प्रत्येकी १०- १० वेळा हा व्यायाम करावा.

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

यानंतर बद्ध कोनासन करा. यासाठी दोन्ही तळपाय समोर घेऊन एकमेकांना जोडा. दोन्ही हाताने तळपाय पकडा आणि शक्य तेवढं समोर वाका. असं १० वेळा करा.

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

तिसरा व्यायाम आहे गोमुखासन. दोन्ही बाजुंनी गोमुखासन प्रत्येकी एकेक मिनिट करावे, असं अंशुका यांनी सांगितलं आहे.

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

चौथे आसन आहे मलासन. सुरुवातीला शक्य नसेल तर हे आसन ३० सेकंद करावे. पण नंतर दररोज हळूहळू थोडं थोडं करून १ मिनिटापर्यंत हा वेळ वाढवत न्यावा.

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

आणि पाचवे योगासन आहे सुप्त मत्स्येंद्रासन. हे आसन दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १०- १० वेळा करावे.