रात्री भात खाल्ल्यानं पोट सुटतं? आयुर्वेद सांगते 'या' पद्धतीनं भात खा, १ इंचही पोट सुटणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:30 IST
1 / 9भात हा भारतीय अन्नाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. सकाळी, दुपारी किंवा रात्री कोणत्याहीवेळी लोक अगदी आवडीनं खात खातात.अनेकजणांचं असं म्हणणं असतं की रात्री भात खाणं नुकसानकारक ठरतं. (Eating Rice At Night Is Good For Health Or Not)2 / 9आयुर्वेदानुसार तांदूळ हा तब्येतीसाठी शीत असतो. जुना भात हा हलका असतो तर नवीन भात हा हेवी असतो. (Does Rice Causes Fat Gain)3 / 9रात्रीच्यावेळी शरीरातील अग्नी कमकुवत होतो आणि अन्न पचणं कठीण होतं. ज्यामुळे गॅस, अपचन, शरीर जड वाटणं अशी समस्या उद्भवतात. 4 / 9वैद्यकियदृष्ट्या पाहिल्यास दिसून येईल की तांदळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे ऊर्जा मिळते. पण रात्री मेटाबॉलिझ्म स्लो झाल्यामुळे शरीर अन्न पूर्णपणे पचवत नाही. 5 / 9पोट फुगणं, एसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय रात्री भात खाऊन नंतर झोपल्यामुळे ती एनर्जी फारशी वापरली जात नाही आणि शरीरावर अतिरिक्त चरबी जमा व्हायला सुरूवात होते ज्यामुळे वजनही वाढू शकतं. 6 / 9याचा अर्थ असा नाही की रात्री भात अजिबात खाऊ नये. तर तुम्हाला हेल्दी आणि साधं अन्न खायंच असेल तर मूंग डाळ खिचडी, जिरा राईस किंवा भाज्यांसोबत खाऊ शकता ज्यामुळे पचायला हलकं होईल आणि शरीरावर अतिरिक्त ताण येणार नाही.7 / 9रात्री भात खायचा असेल तर आधी गरम पाणी किंवा सूप प्या ज्यामुळे पचनक्रिया सक्रिय होईल. ब्राऊन राईस किंवा जुन्या तांदळाचा वापर करा. यात फायबर्स जास्त असतात आणि स्टार्च कमी असते. 8 / 9भातात थोडं तूप घालून खाल्ल्यास पचन चांगले होते आणि गॅस होत नाही.9 / 9वल्यानंतर 5 ते 10 मिनिटं चालायची सवय ठेवा. यामुळे गॅस होत नाही. झोपण्याच्या कमीत कमी 2 तास आधी जेवण करा जेणेकरून शरीराला पचायला वेळ मिळेल.