Join us

पावसाळ्यात प्यायचे पाणी भरताना घ्या ही काळजी, दूषित पाणी तर पित नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 14:24 IST

1 / 8
पावसाळा सुरू झाला की सगळीकडे भरपूर पाणी असते. तरीही पिण्याच्या पाण्याचे हाल होतात. कारण पाणी जरी खुप असले तरी ते खराब झालेले असते. त्यात कचरा, माती, धूळ सगळं मिसळत. म्हणून पावसाळ्यात साथीचे आजार वेगाने पसरतात.
2 / 8
पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. मात्र ते पाणी तसेच पिणे चांगले नाही. पिण्याचे पाणी जरी फिल्टर होऊन येत असले तरीही त्यात जंतू असतातच. काही गोष्टींची काळजी घेऊन पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतात.
3 / 8
पिण्याचे पाणी भरताना ते किमान १५ मिनिटे उकळायचे. मगच भरायचे. उकळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. त्यातील बॅक्टेरिया तसेच विषाणू नष्ट होतात. उकळल्यावर झाकून ठेवायचे आणि वापरायचे.
4 / 8
पाणी भरताना त्यात तुरटीचा खडा गोलगोल फिरवायचा. १० ते २० वेळा फिरवायचा. मग त्या पाण्याला धक्का न लागू देता तसेच तासभर ठेवायचे. पिंपाच्या तळाशी सगळा गाळ जमा झालेला दिसेल. तुरटी पाणी शुद्ध करते.
5 / 8
पाणी भरताना पाण्याला आपले हात लागतात. त्यामुळे पाणी भरण्याआधी हात अगदी स्वच्छ धुवायचे. कारण आपल्या हातावर असणारे जंतू पाण्यात जाऊ शकतात.
6 / 8
इतर वेळी पाण्याचे पिंप आपण आठवड्यातून एकदा किंवा कधीतरी मध्येच धुतो मात्र पावसाळ्यात पाण्याचे पिंप सतत धुवायचे. म्हणजे तळाला बसलेला गाळ आणि इतर न दिसणारे घटक पिंपात राहत नाहीत.
7 / 8
जर नळाचे पाणी भरत असाल तर पाणी गाळायचे फडके सतत बदला. चांगले स्वच्छच फडके घ्यायचे. पाणी पिवळट येत असले तर लगेच भरु नका. काही वेळ पाणी वाहू द्या. मगच चांगले स्वच्छ येणारे पाणी घ्यायचे.
8 / 8
पाणी गाळण्यासाठी फिल्टर जर लावला असेल, तर त्याची देखभाल करणेही गरजेचे असते. त्याची स्वच्छता करायला हवी. वेळोवेळी तपासणी करुन घ्यायची.
टॅग्स : पाऊसहेल्थ टिप्सआरोग्यपाणी