'या' ५ समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम पाणी, जाणून घ्या गंभीर नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:02 IST
1 / 7रोज सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देत असतात. कोमट पाणी प्यायल्यानं पोट साफ होण्यास, वजन कमी करण्यास, डायजेशन सुधारण्यास असे कितीतरी फायदे मिळतात. त्यामुळे भरपूर लोक सकाळी कोमट पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कोमट पाणी सगळ्यांसाठीच फायदेशीर नसतं. काही लोकांसाठी कोमट पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. कोमट पाणी पिण्याचे काही नियम असतात. अशात कोणत्या ५ लोकांनी कोमट पाणी पिऊन नये याबाबत जाणून घेऊया. 2 / 7भलेही कोमट पाणी प्यायल्यानं ब्लड सर्कुलेशन आणि डायजेशन सुधारतं. पण काही लोकांसाठी कोमट पाणी नुकसानकारक ठरू शकतं. अशात कोमट पाणी कुणी टाळावं हे जाणून घ्या.3 / 7डिहायड्रेशन ही एक गंभीर स्थिती आहे. यात शरीरात पाणी कमी होतं. एनसीबीआयवर प्रकाशित एका शोधानुसार, हायड्रेशनसाठी सगळ्यात बेस्ट १६ डिग्री सेल्सिअस तापमान असलेलं पाणी आहे. जे नॉर्मल पाणी असतं. अशात ही समस्या झाल्यावर जर तुम्ही कोमट किंवा गरम पाणी प्याल तर डिहायड्रेशनची समस्या अधिक वाढू शकते.4 / 7जर तुमच्या तोंडात फोड झाला असेल किंवा तोंडाच्या आता कशामुळे ब्लीडिंग होत असेल तर गरम किंवा कोमट पाणी पिऊ नये. हेल्थडायरेक्टनुसार, अशा स्थितीत थंड पाणी प्यावं, यानं ब्लीडिंग थांबेल. गरम पाणी प्याल तर फोड आणखी वाढू शकतो.5 / 7पोटातील अल्सरला गॅस्ट्रिक अल्सर म्हटलं जातं. एक्सपर्ट सांगतात की, गरम पाण्यामुळे पोटातील आतील लाइन डॅमेज होऊ शकते. यामुळे गॅस्ट्रिक अल्सर आणखी गंभीर होऊ शकतो.6 / 7अॅसिडिटी झाल्यावर आयुर्वेदात थंड दूध पिण्याचा सल्ला दिला आहे. कारण थंड दुधानं फ्लूइड शांत करण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे या समस्येत गरम किंवा कोमट पाण्याऐवजी नॉर्मल पाणीच प्यावं. तसेच जास्त पाणी पिऊ नये.7 / 7ताप आल्यावर शरीराचं तापमान वाढल्यानं आणि घाम जात असल्यानं डिहायड्रेशन होतं. त्यामुळे ताप आल्यावर हायड्रेड राहण्यासाठी नॉर्मल पाणी प्यावं. तापात गरम पाणी कधीच पिऊ नये.